Sunday, July 07, 2024 12:40:15 AM

आज देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी होणार 'श्रीकृष्णजन्माष्टमी'

आज देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी होणार श्रीकृष्णजन्माष्टमी

मुंबई, ६ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: भगवान श्रीकृष्णांचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला झाला. त्यामुळे दरवर्षी हा दिवस श्रीकृष्ण जयंती म्हणून साजरा केला जातो. भारतासह संपूर्ण जगभरात जन्माष्टमीचा सण साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी असंख्य भाविकांनी जोरदार तयारी करण्यास सुरुवात केली आहे. सुख-समृद्धी आणि शांतीसाठी लाखो भाविक श्रीकृष्ण जन्माष्टमीला उपवास ठेवत असतात. याशिवाय जन्माष्टमीला श्रीकृष्णाला खीर, लाडू किंवा श्रीखंड या पदार्थांचं नैवेद्य अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं.

भगवान श्रीकृष्ण रोहिणी नक्षत्रात जन्माला आले. त्यामुळे जन्माष्टमी साजरी करताना रोहिणी नक्षत्रही ध्यानात ठेवले जाते. यंदा जन्माष्टमीच्या तारखेबाबत मोठा गोंधळ आहे. कोणी जन्माष्टमीचा सण ६ सप्टेंबर तर कोणी ७ सप्टेंबरला सांगत आहेत. महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या पंचांगानुसार श्रावण सुरु आहे तर उत्तर भारत पंचांगानुसार भाद्रपद सुरु आहे. जन्माष्टमीची नेमकी तारीख कोणती आहे ते जाणून घेऊया.

कधी साजरी होणार जन्माष्टमी?
यावेळी भाद्रपद कृष्ण अष्टमी तिथी ६ सप्टेंबर रोजी दुपारी ०३.३८ वाजता सुरू होईल आणि ७ सप्टेंबर रोजी दुपारी ०४.१४ वाजता समाप्त होईल. या काळात संपूर्ण रात्रभर रोहिणी नक्षत्र राहील. ज्योतिषांच्या मते, यावर्षी गृहस्थ ६ सप्टेंबर रोजी जन्माष्टमी साजरी करतील. तर वैष्णव संप्रदायातील लोकं ७ सप्टेंबर रोजी जन्माष्टमीचा सण साजरा करणार आहेत.

शुभ मुहूर्त
ज्योतिषांचे म्हणणे आहे की, यावर्षी घरगुती जीवनातील लोक ६ सप्टेंबर रोजी जन्माष्टमी उत्सव साजरा करतील. जन्माष्टमीच्या पूजेसाठी ६ सप्टेंबर रोजी रात्री ११.५६ ते १२.४२ पर्यंत सर्वोत्तम शुभ मुहूर्त असेल.


सम्बन्धित सामग्री