Tuesday, July 02, 2024 09:32:31 AM

आशिया कपमध्ये भारत-पाक पुन्हा भिडणार

आशिया कपमध्ये भारत-पाक पुन्हा भिडणार

मुंबई, ५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : नेपाळचा दारुण पराभव करत टीम इंडियाने आशिया कपमधील सुपर ४ संघांच्या यादीत प्रवेश केला आहे. पाकिस्तानी क्रिकेट संघ यापूर्वीच सुपर ४ मध्ये पोहचला आहे. त्यामुळं आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा रंगतदार सामना होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. पल्लिकल येथील मैदानावर भारत-पाकमधील सामना मुसळधार पावसामुळं रद्द झाला होता. त्यानंतर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला होता. गट अ च्या गुणतालिकेत पाकिस्तान पहिल्या तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्यामुळं आता येत्या १० सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा साखळी सामना खेळवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आशिया कपमधील पहिल्या गटातील दोन्ही संघांमध्ये हा सामना होणार आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबोतील क्रिकेट ग्राउंडवर भारत-पाकिस्तानचा संघ आमने-सामने येणार आहे. १० सप्टेंबरला दुपारी तीन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. भारत-पाकिस्तानमधील पहिला सामना पलिक्कल येथे झाला होता. त्यानंतर आता दुसरा सामना कोलंबो येथे होणार असून त्यासाठी चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात तिकिटांची बुकिंग सुरू करण्यात आली आहे. विराट कोहली विरुद्ध हारिस रऊफ आणि रोहित शर्मा विरुद्ध शाहिन शाह आफ्रिदी असा रंगतदार सामना पुन्हा एकदा पाहायला मिळणार असल्याने चाहत्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

यंदाचा आशिया कप पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आला होता. परंतु भारताने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील काही सामने श्रीलंकेत हलवण्यात आले. परंतु गेल्या काही दिवसांपासून श्रीलंकेत मुसळधार पाऊस होत असल्याने त्याचा विपरीत परिणाम क्रिकेट सामन्यांवर होताना दिसून येत आहे. पावसामुळं भारत-पाक सामना रद्द झाला. त्यामुळं आता येत्या १० सप्टेंबरला पावसाने हजेरी लावू नये, अशी प्रार्थना पाकिस्तान आणि भारतातील क्रिकेट चाहत्यांकडून करण्यात येत आहे.

  

सम्बन्धित सामग्री