Tuesday, July 02, 2024 09:30:28 AM

two-consecutive-earthquakes-on-the-moon-in-two-days
चंद्रावर दोन दिवसात सलग दोन भुकंप

चंद्रावर दोन दिवसात सलग दोन भुकंप

मुंबई, ३ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी :  चांद्रयानने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केल्याचा आज ९ वा दिवस आहे. पहिल्यांच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोव्हर उतरल्यामुळे प्रत्येक दिवस महत्त्वपुर्ण आहे. यातून समोर येणारी माहिती जगभराच्या अवकाश क्षेत्रावर प्रभाव टाकू शकते. ३१ ऑगस्टला इस्रोने अत्यंत महत्त्वपुर्ण माहिती जगसमोर आणली. चांद्रयान-३ च्या विक्रम लँडरवर बसवलेल्या इंस्ट्रुमेंट ऑफ लुनार सिस्मिक अॅक्टिव्हिटी पेलोडने चंद्राच्या पृष्ठभागावर भूकंपाच्या नैसर्गिक घटनेची नोंद केली आहे. २६ ऑगस्टला हा भूकंप झाला होता. भूकंपाच्या उगमस्थानाचा तपास सुरू आहे.

इस्रोने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, चांद्रयान-3 लँडरवरील आयएलएसए पेलोड मायक्रो इलेक्ट्रो मेकॅनिकल सिस्टम (एमईएमएस) तंत्रज्ञानावर आधारित आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर असे उपकरण पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे. या उपकरणाने रोव्हर आणि इतर पेलोडच्या हालचालींमुळे चंद्रावरील कंपनांची नोंद केलीये. इस्रोने गुरुवारी दोन छायाचित्रे जारी केली. यातील पहिले चित्र २५ ऑगस्ला चंद्राच्या पृष्ठभागावर प्रज्ञान रोव्हरच्या हालचालीच्या वेळी रेकॉर्ड केलेल्या कंपनांचे आहे. दुसरे चित्र २६ ऑगस्टला नोंदवलेली नैसर्गिक घटना आहे.

आयएलएसएमध्ये सहा उच्च-संवेदनशीलता प्रवेगमापकांचा क्लस्टर आहे. सिलिकॉन मायक्रोमशिनिंग प्रक्रियेच्या मदतीने हे एक्सेलेरोमीटर भारतात तयार करण्यात आले आहेत. त्याच्या कोर सेन्सिंग एलिमेंटमध्ये कॉम्ब-स्ट्रक्चर्ड इलेक्ट्रोडसह स्प्रिंग मास सिस्टम असते. बाह्य कंपनामुळे आयएलएसए स्प्रिंगची हालचाल होते, ज्यामुळे विद्युत चार्ज साठवण्याची क्षमता बदलते. या चार्जचे व्होल्टेजमध्ये रूपांतर होते. आयएलएसए चे मुख्य उद्दिष्ट नैसर्गिक भूकंप , लँडर किंवा रोव्हर आघात किंवा चंद्राच्या पृष्ठभागावरील इतर कोणत्याही कृत्रिम घटनेमुळे होणारी कंपने मोजणे आहे. २५ ऑगस्ट रोजी रोव्हरच्या हालचालीमुळे कंपने रेकॉर्ड केली गेली, त्यानंतर २६ ऑगस्टला देखील कंपनांची नोंद झाली, नैसर्गिक वाटणाऱ्या कंपनांमागचे कारण शोधण्याचे काम सुरु आहे.

आयएलएसए पेलोडची रचना आणि निर्मिती प्रयोगशाळेसाठी इलेक्ट्रो-ऑप्टिक्स सिस्टम्स बेंगळुरू येथे करण्यात आली. खासगी उद्योगांनीही याला पाठिंबा दिला. चंद्राच्या पृष्ठभागावर आयएलएसए कसे तैनात करायचे याची यंत्रणा यूआर राव सॅटेलाइट सेंटर बेंगळुरू येथे तयार करण्यात आली. गुरुवारीच इस्रोने रोव्हर प्रज्ञानचा एक नवीन व्हिडिओ शेअर केला, ज्यात ते सुरक्षितपणे फिरताना आणि चांगल्या प्रकारे काम करताना दिसत आहे. लँडर विक्रमच्या इमेजर कॅमेऱ्याने प्रग्यानच्या फिरण्याचा फोटो काढला होता. यासह, विक्रम लँडरवर बसवलेल्या चंद्राच्या रेडिओ अॅनाटॉमी अतिसंवेदनशील लोनोस्फियर आणि अॅटमॉस्फियर-लँगमुइर प्रोबने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्लाझ्मा शोधला आहे.

  

सम्बन्धित सामग्री