Thursday, July 04, 2024 11:00:10 AM

neeraj-chopra-will-go-for-gold-today
नीरज चोप्रा आज 'गोल्ड'साठी उतरणार

नीरज चोप्रा आज गोल्डसाठी उतरणार

मुंबई, २७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : पण यावेळी जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या पदरात काही पदके येऊ शकतात. जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारताचे पदकांचे खाते अद्याप उघडलेले नाही. जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या इतिहासात भारताला आतापर्यंत केवळ दोनच पदके जिंकता आली आहेत. २००३ मध्ये अंजू बॉबी जॉर्जने महिलांच्या लांब उडीत कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर भालाफेकपटू नीरज चोप्राने गेल्या वर्षी यूजीन येथे झालेल्या चॅम्पियनशिपमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिले. पण यावेळी जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या पदरात काही पदके येऊ शकतात. आज (२७ ऑगस्ट) बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या चॅम्पियनशिपच्या शेवटच्या दिवशी भारताला ५ पदके जिंकण्याची संधी आहे. यामध्ये सर्वात मोठी आशा गोल्डन बॉय नीरज चोप्राकडून आहे. ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज भालाफेकच्या अंतिम फेरीत गोल्ड मेडलसाठी खेळणार आहे. नीरज व्यतिरिक्त आणखी दोन भारतीय भालाफेकपटू डीपी मनू आणि किशोर जेनादेखील भालाफेकच्या अंतिम फेरीत आहेत. भालाफेक व्यतिरिक्त ट्रॅक इव्हेंटमध्येही भारताची नजर दोन पदकांवर आहे. भारताच्या ४x४०० मीटर पुरुष रिले संघाने शनिवारी अंतिम फेरीत धडक मारली. मोहम्मद अनस याहिया, अमोज जेकब, मोहम्मद अजमल वरियाथोडी आणि राजेश रमेश यांच्या चौकडीने यूएसएनंतर दुसरे स्थान पटकावले. यासोबतच भारताचे आव्हान ३००० मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत असणार आहे. पारुल चौधरीने येथे अंतिम फेरीत धडक मारली आहे. जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील ट्रॅक इव्हेंटच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी पारुल ही दुसरी भारतीय महिला खेळाडू आहे.


सम्बन्धित सामग्री