Sunday, July 07, 2024 09:57:23 PM

tension-over-madrashya-in-peth-shivapura
पेठ शिवापुरचा मदरसा वादात, तणाव वाढला

पेठ शिवापुरचा मदरसा वादात तणाव वाढला

पाटण, २४ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : पाटण तालुक्यातील मोरगिरी विभागात उभारत असलेल्या मदरसा विरोधात मोरगिरी, पेठ शिवापुरसह पंचक्रोशीतील नागरिक आक्रमक झाले आहेत.

गुरुवारी (दि. २४ ऑगस्ट २०२३) सकाळपासून मोरगिरी येथील बाजार तळावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या ठिकाणी ५ ते १० हजार लोकांसाठी मदरसा उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे गेल्या एक वर्षापासून पेठ शिवापूर येथील बाजार हा मोरगिरी येथे व्यापाऱ्यांनी स्थलांतरित केला आहे. या व्यापाऱ्यांना पेठ शिवापूर ग्रामपंचायतीने नोटीसा देऊन बाजार पुन्हा मूळ जागी बाजार भरवावा अशी सूचना केली होती. परंतु पेठ शिवापूर ग्रामपंचायत हद्दीत उभारण्यात येत असलेल्या मदरश्याचे बांधकाम बंद करून मदरसा जमीनदोस्त करावा, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. पाटण पोलिसांनी गुरुवारी (दि. २४ ऑगस्ट २०२३) सकाळी मोरगिरी येथे दाखल होत चोख बंदोबस्त ठेवला आहे. तर यावेळी पेठ शिवापूर ग्रामपंचायतीने व्यापाऱ्यांना कारवाईची नोटीस दिली आहे. मात्र विभागातील ग्रामस्थ सांगतील तिथेच आम्ही बाजाराला बसणार असा आक्रमक पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतला आहे. तर या घटनेमुळे मोरगिरी ग्रामपंचायतही ॲक्शन मोडवर आलेली आहे.

           

सम्बन्धित सामग्री