Sunday, July 07, 2024 08:38:59 PM

new-curriculum-framework-proposing-two-board-exams-in-a-year-handed-over-to-ncert
दहावी बारावीच्या परीक्षा वर्षातून दोनदा

दहावी बारावीच्या परीक्षा वर्षातून दोनदा

नवी दिल्ली, २४ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत शालेय शिक्षणाचा अंतिम आराखडा प्रस्तुत केला. त्यानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जाणार आहेत, तर अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना किमान दोन भाषा सक्तीने शिकाव्या लागणार असून, त्यातील एक स्थानिक भारतीय भाषा असेल. https://www.youtube.com/watch?v=-wgoYqyNHRI दहावी-बारावीची परीक्षा दोन टप्प्यात घेण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केला आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षापासून दहावी-बारावीच्या परीक्षेत मोठे बदल होणार आहेत. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची आखणी करण्यात येत असून विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा बोर्डाची परीक्षा देता येईल. या दोन्ही परीक्षेतील सर्वोत्तम गुण निवडण्याची संधी देखील विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे.

     

सम्बन्धित सामग्री