Saturday, October 05, 2024 03:31:28 PM

chandrayaan-3-likely-to-land-on-the-moon-by-5-44-pm
चांद्रयान - ३ संध्याकाळी ५.४४ पर्यंत चंद्रावर उतरण्याची शक्यता

चांद्रयान - ३ संध्याकाळी ५४४ पर्यंत चंद्रावर उतरण्याची शक्यता

नवी दिल्ली, २३ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : भारताचे चांद्रयान - ३ संध्याकाळी चंद्रावर उतरणार आहे. यान संध्याकाळी ५.४४ वाजेपर्यंत अपेक्षित ठिकाणी पोहोचेल. यानंतर टप्प्याटप्प्याने यानाचा वेग कमी केला जाईल. यानातून विक्रम लँडर चंद्रावर उतरेल. लँडरमधून रोव्हर बाहेर पडेल आणि चंद्रावर संशोधन करण्याचे काम सुरू करेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडर उतरेल त्यावेळी सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे. याआधी रशियाने लुना २५ यान चंद्रावर उतरवण्याचा प्रयत्न केला होता. पण हा प्रयत्न अयशस्वी झाला आणि रशियाचे यान चंद्राच्या पृष्ठभागावर धडकले होते. यामुळे भारताचे यान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग कसे करणार याकडे अनेकांचे लक्ष आहे. https://twitter.com/isro/status/1694248755594436829 इसरोचे ट्वीट सॉफ्ट लँडिंगसाठी आवश्यक तयारी झाली आहे. चंद्रावर ठरलेल्या जागेवर चांद्रयान - ३ चे लँडर उतरणार आहे. ही प्रक्रिया संध्याकाळी ५ वाजून ४४ मिनिटांनी सुरू होईल, अशी माहिती ट्वीट करून इसरोने दिली आहे. लँडिंगचे थेट प्रक्षेपण संध्याकाळी ५ वाजून २० मिनिटांनी सुरू होईल; असेही इसरोने सांगितले आहे.


सम्बन्धित सामग्री