Saturday, October 05, 2024 03:52:47 PM

last-fifteen-minutes-are-crucial-for-chandrayaan-3
चांद्रयान - ३ साठी शेवटची पंधरा मिनिटे महत्वाची

चांद्रयान - ३ साठी शेवटची पंधरा मिनिटे महत्वाची

नवी दिल्ली, २३ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं भारताचं चांद्रयान - ३ आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावर उतरणार आहे. भारतासाठी ही अभिमानाची बाब असेल. या मोहिमेची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. भारताच्या चांद्रयान - ३ चे लँडर चंद्रावर उतरेल. या लँडरमधून बाहेर येऊन रोव्हर चंद्रावर संशोधन करेल. या प्रक्रियेची उलटी मोजणी सुरू आहे. चांद्रयान - ३ चंद्रावर उतरेल त्यावेळी होणार असलेल्या घडामोडींचे थेट प्रक्षेपण इसरोच्या वेबसाईटवर आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बघता येईल. लँडर मॉड्युलसोबत अवकाशातून आणि जमिनीवरून अखंड संपर्काची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र शेवटच्या १५ मिनिटांमुळे धाकधुक वाढली आहे. शेवटची १५ मिनिटे म्हणजेच ९०० सेकंद ज्याच्यावर भारताच्या मिशन चांद्रयान - ३ चे यश अवलंबून आहे. ती १५ मिनिटे भारताच्या अंतराळ मिशनचे चित्र कायमचे बदलून टाकणार आहेत. भारतीय वेळेनुसार बुधवार २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान - ३ चे लँडर चंद्रावर उतरेल. लँडिंगची प्रक्रिया पंधरा मिनिटांत पार पडेल. ही पंधरा मिनिटे मोहिमेसाठी अतिशय महत्त्वाची आहेत. चांद्रयान - ३ चंद्रावर उतरण्याचे तीन टप्पे चांद्रयान - ३ चे लँडर चंद्राच्या जमिनीपासून ८०० ते १३०० मीटर अंतरावर पोहोचेल यानातील विक्रम लँडरचे सेंसर कार्यरत होतील सेन्सरच्या मदतीने लँडर आणि चंद्र या दरम्यानची उंची मोजली जाईल पुढच्या १३१ सेकंदात चंद्राच्या पृष्ठभागापासून १५० मीटर अंतरावर असेल. लँडरचा कॅमेरा चंद्राच्या जमिनीचे फोटो काढेल. प्रतिकूल परिस्थिती असेल तर विक्रम लँडर ७३ सेकंदात चंद्रावर उतरेल. जर नो- गो अट असेल तर १५० मीटर पुढे जाऊन थांबेल. पुन्हा पृष्ठभाग तपासेल आणि सर्व ठीक असेल तर लँड होईल. बुलढाण्यात चांद्रयान - ३ साठी प्रार्थना बुलढाण्यात चांद्रयान - ३ मोहिमेच्या यशासाठी प्रार्थना करण्यात आली. तसेच ढोलताशे वाजवत मोहिमेसाठी इसरोच्या पथकाला शुभेच्छा देण्यात आल्या.

        

सम्बन्धित सामग्री