Wednesday, October 02, 2024 10:52:54 AM

central-government-will-buy-2-lakh-metric-tonnes-of-onion
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी

मुंबई, २२ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेला दोन लाख मेट्रिक टनाचा कांदा खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. प्रतिक्विंटल २४१० रुपये या दराने सरकार शेतकऱ्यांकडून कांद्याची खरेदी करणार आहे. राज्य शासन आणि केंद्र सरकार परस्पर समन्वय राखून कांद्याची खरेदी करणार आहे. आवश्यकता अतिरिक्त कांदा खरेदी करू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. https://twitter.com/CMOMaharashtra/status/1693914112022270124 कांद्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री धनंजय मुंडे या सर्वांनी केंद्र सरकारसोबत बातचीत केली. जपानच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्याशी फोनवरून बातचीत केली. यानंतर कांद्याच्या प्रश्नावर तोडगा निघाला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1693850616257466543 कांद्याची खरेदी सुरू निर्यातीच्या कांद्यावर केंद्र सरकारने ४० टक्के कर लागू केला आहे. या निर्यात शुल्काला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रात व्यापारी संघटनांनी कांद्याचे लिलाव थांबवले. सलग दोन दिवस लिलाव ठप्प असल्यामुळे राज्यातील निवडक भागांमध्ये कांद्याची उलाढाला सुरू होती. पण बहुसंख्य बाजार समित्यांमधील कांद्याची उलाढाला ठप्प होती. यावर तोडगा काढत सरकारने कांद्याची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील निवडक बाजार समित्यांमध्ये निर्णय जाहीर झाल्यानंतर लगेच कांदा खरेदी सुरू झाली आहे.


सम्बन्धित सामग्री