Sunday, July 07, 2024 02:57:57 AM

independence-day-2023-live-updates-15-august-celebration-flag-hoisting-narendra-modi-speech-red-fort
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संपूर्ण भाषण एकच क्लिकवर

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संपूर्ण भाषण एकच क्लिकवर

भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. यावेळी २१ तोफांची सलामी देण्यात आली.  यानंतर पंतप्रधान मोदी यांनी देशाला उद्देशून भाषण केले. भाषणात पंतप्रधानांनी विकसित भारत बनविण्याचा संकल्प करत असल्याचे जाहीर केले. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत, मणिपूर, शेतकरी, शेजारी राष्ट्रांबद्दलचं धोरण यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. मणिपूरमधील समस्येवर शांततेतून तोडगा काढणार असे मोदी या वेळी म्हणाले. https://www.youtube.com/watch?v=sGab7dzIDaY पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाल किल्ल्यावरील भाषणातील महत्त्वाचे मुद्दे भ्रष्टाचाराच्या आणि घराणेशाहीच्या विरोधात लढा देत राहणार २०४७ मध्ये भारत विकसित झालेला असेल लाल किल्ल्यावरून पुन्हा तुमचे आशीर्वाद मागतोय मुलांना मातृभाषेत शिक्षण घेण्याची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिली सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय भारतीय भाषांमध्ये उपलब्ध गावागावातील दोन कोटी महिलांना लखपती बनवण्याचा मानस घटना मणिपूरला घडली तरी वेदना महाराष्ट्राला होतात महिला सक्षमीकरणावर आमचा भर जी २० परिषदेत महिला सक्षमीकरणाचा मुद्दा मांडला सर्वात जास्त महिला वैमानिक भारतात भारताची एकता हीच आमची ताकद भारताच्या विविधतेतील एकता हेच आमचं सामर्थ्य देशात होणाऱ्या साखळी बॉम्बस्फोटाचा काळ मागे पडला आपल्या सर्व सीमा सुरक्षित हा नवा भारत कधीही थांबणार नाही नव्या संसदेचं कामही वेळेत केलं ज्या योजनांचं भूमिपूजन करतो, त्यांचं लोकार्पणही करतो संपूर्ण जगाला महागाईचा मोठा फटका बसला, भारताने महागाई नियंत्रणासाठी सर्वाधिक प्रयत्न केले पाच वर्षात साडेतेरा कोटी भारतीयांची गरीबी दूर झाली आहे युरियासाठी सरकारकडून मोठी सबसिडी एक रँक, एक पेन्शनला प्राधान्य दिलं मुद्रा योजनेचा भारतीयांना फायदा आज भारताची अर्थव्यवस्था ही जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. देशातील नागरिकांनी सरकार फॉर्म केले म्हणून मोदी सरकारला रिफॉर्म करणे शक्य झाले, परफॉर्म करण्याची संधी मिळाली. २०१४ मध्ये तुम्ही मजबूत सरकार दिलंत म्हणून आम्ही देशाचा विकास करू शकलो देशाच्या विकासासाठी स्थिर, मजबूत सरकार हवं राष्ट्र प्रथम हा आपला नारा आहे जी - २० मुळे भारताची ओळख निर्माण झाली कोरोनाकाळात भारताचं सामर्थ्य जगाने पाहिलं, कोरोनानंतर जगात खूप बदल झाले, बदलत्या जगाला दिशा देण्यात भारताचे मोठे योगदान स्टार्टअपमध्ये भारत जगात प्रथम स्थानी, तंत्रज्ञानात भारताचा जगभर डंका, कृषी क्षेत्रात देश आगेकूच करतोय, शेतकरी आणि कामगारांचे अभिनंदन भारताकडे डायवर्सिटी, डोमोग्राफी आणि डेमोक्रसी... भारताच्या सामर्थ्यावर जगाला विश्वास, आता आपल्याला थांबायचं नाही... पुढील एक हजार वर्ष प्रभाव जाणवेल असे प्रगतीकडे वाटचाल करणारे निर्णय घ्यायचे आहेत. जगाच्या तुलनेत भारतात सर्वाधिक युवाशक्ती भारताकडे प्रतिभेची कमतरता नाही, भारताविषयी जगात उत्सुकता आणि विश्वास गुलामीच्या जोखडातून भारत मुक्त झाला आहे, जगात भारताविषयी भरपूर आकर्षण शांततेतून तोडगा निघेल देश मणिपूरच्या लोकांसोबत मणिपूरमध्ये आता शांतता निर्माण झाली आहे भारताच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्यांना नमन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण लाल किल्ल्यासमोरील ज्ञानपथ फुलांनी सजला, पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावर आगमन देशाचा आज ७७वा स्वातंत्र्यदिन, मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना अभिवादन. मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होणार, पंतप्रधान दहाव्यांदा लाल किल्ल्यावरून संबोधित करणार


सम्बन्धित सामग्री