Thursday, July 04, 2024 08:38:03 AM

narendra-modi-speech-in-lok-sabha-on-no-confidence-motion
बघा पंतप्रधान मोदींचे भाषण जसेच्या तसे

बघा पंतप्रधान मोदींचे भाषण जसेच्या तसे

काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधकांनी लोकसभेत अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. सलग ३ दिवसांच्या चर्चेनंतर आवाजी मतदान झाले. या मतदानात अविश्वास प्रस्ताव पडला. याआधी अविश्वास प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले. पंतप्रधान मोदी यांनी २ तासांपेक्षा जास्त वेळ भाषण केले. भाषणात पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर तीव्र टीका केली. भाषण सुरू असताना काँग्रेससह विरोधी पक्षांनी सभात्याग केला. पण विरोधी बाकावर बसलेले खासदार सुनिल तटकरे सभागृहात बसले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भाषण करताना काँग्रेसच्या देशविरोधी वर्तनाची अनेक उदाहरणे सांगितली. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मिझोराममध्ये हवाई हल्ला करून भारतीय नागरिकांना लक्ष्य केले. याआधी चीनने हल्ला केला त्यावेळी पंतप्रधान नेहरू यांनी आसामला वाऱ्यावर सोडले होते. हे सत्य पंतप्रधान मोदी यांनी देशाला सांगितले. काँग्रेसची सत्ता असताना श्रीलंकेला भारताचे एक बेट कायमचे देण्यात आले. हे पण पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत सांगितले. पंतप्रधानांनी ही उदाहरणे ठोस माहितीआधारे लोकसभेत सादर केली. पंतप्रधान बोलत असताना विरोधकांनी थेट सभात्याग केला. बघा पंतप्रधान मोदींचे भाषण जसेच्या तसे (व्हिडीओ)


सम्बन्धित सामग्री