Viral Funny Video: सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डान्स व्हिडिओ पाहायला मिळतात. त्यातले काही डान्स जबरदस्त असतात, तर काही गंमतशीर असतात. असा एक गायीसमोर केलेल्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एक तरुणी गायीची चेष्टा करत तिच्यासमोर वेडावाकडा डान्स करताना दिसते. सुरुवातीला गायही शांत उभी असते. पण शेवटी गायीचाही संयम सुटतो.. आणि नाचणाऱ्या तरुणीला चांगला प्रसाद मिळतो.
लहानपणापासूनच गाय, बैल, म्हैस असे प्राणी पाळीव असले तरी त्यांच्या जवळ न जाण्याचा इशारा लहानपणी वडिलधाऱ्यांकडून मिळालेला असतो. तसंच, कोणत्याही प्राण्यांच्या खोड्या काढल्या तर त्यांच्याकडूनही काही तरी प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता असते. असे असतानाही या तरुणीने गायीसमोर डान्स करण्याचा पराक्रम केला आणि तिला जन्माची अद्दल घडली. तसेच, मोठी दुखापत होण्यापासून थोडक्यात वाचली हे तुम्ही पाहू शकता.
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र असे व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. डान्स, स्टंट, जुगाड, भांडण यांशिवाय अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. तुम्ही अनेक रस्ते अपघातांचे व्हिडिओ देखील पाहिले असतील. अनेकदा इतके गंभीर आणि अंगावर काटा आणणारे व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या असाच एका व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. खरं तरं या व्हिडिओतून आपला निष्काळजीपण किती महागात पडू शकतो हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. मात्र हा व्हिडिओ तुम्हाला हसवल्याशिवायही राहणार नाही.
हेही वाचा - कशी नशिबानं थट्टा आज मांडली! शिकार आणि शिकारी एकाच विहीरीत; रानडुकराचा काळ आला होता, पण..
या व्हिडीओमध्ये, एका गोठ्याचा परिसर दिसत आहे. तिथेच दोन गायी शांतपणे उभी असलेली दिसत आहे. याच वेळी एक तरुणी एका गायीला चारा खायला टाकते. ही तरुणी अचानक विचित्र हातावारे करत डान्स करायला लागते. हे पाहून ती गाय तिला आपल्या डोक्याने धडक देते. यामुळे तरुणी जवळच असलेल्या पाण्याच्या छोट्या टाकीत जाऊन पडते. तिला उठणेही कठीण होते इतक्या जोरात गायीने धक्का दिलेला असतो.
हेही वाचा - राहुल द्रविडची रिक्षाचालकाशी भररस्त्यात वादावादी; कारला रिक्षाची धडक लागल्याने नाराज, VIDEO व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @bihari.broo या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. लोकांनी आपल्या प्रतिक्रिया देताना हसण्याचे इमोजी शेअर केले आहे. एका युजरने म्हटले आहे की, ‘नशीब गायीला शिंग नव्हती, नाहीतर आयुष्यभर नाचू शकली नसती’, दुसऱ्याने म्हटलंय की, कुठेही काहीही केल्यावर असंच होणार”, तर आणखी एकानं “व्हिडीओसाठी कोणत्याही थराला जाते तरुणाई” अशी प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडिओ कुठला आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.