Sunday, June 30, 2024 08:35:47 AM

Rohit Pawar on Rulling Party
रोहित पवारांनी व्हिडिओ शेअर करत धरले धारेवर

राशपचे खासदार रोहित पवार यांनी ट्विटर म्हणजेच एक्स या समाजमाध्यमावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे.

रोहित पवारांनी व्हिडिओ शेअर करत धरले धारेवर
Rohit Pawar

मुंबई, १८ मे २०२४, प्रतिनिधी : राशपचे खासदार रोहित पवार यांनी ट्विटर म्हणजेच एक्स या समाजमाध्यमावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ बीड लोकसभा मतदारसंघातील आहे. या व्हिडिओत मतदान केंद्रावर घडलेला गैरप्रकार दाखवण्यात आलेला आहे. 

भाजपकडून बीड लोकसभा मतदारसंघात विशेषत: परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान, मतदान केंद्रे ताब्यात घेणे असे गैरप्रकार करण्यात आले. सत्ताधाऱ्यांची ही दडपशाही रोखण्याची हिम्मत बबनभाऊ गीते यासारख्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवली अशी पोस्ट करत राशपच्या रोहित पवारांनी बीड लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेवर आरोप केले आहेत.   

निवडणूक आयोग या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करणारे आहे की फक्त विरोधकांवर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात धन्यता मानणार आहे? असा प्रश्न विचारत त्यांनी निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले आहेत. पुढे त्यांनी असो पण एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणाला आदर्श  घालून देणाऱ्या बीड जिल्ह्यात दडपशाहीचे हे प्रकार सत्ताधाऱ्यांना शोभत नाहीत असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांनाही धारेवर धरले आहे.       


सम्बन्धित सामग्री