Friday, July 05, 2024 09:20:25 PM

Maximum voting appeal from the administration
प्रशासनाकडून जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन

१३ मे २०२४ रोजी सोमवारी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे.चौथ्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील ३ मतदारसंघात सोमवारी मतदान पार पडणार आहे.

प्रशासनाकडून जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन
loksabha election

पुणे, १२ मे २०२४, प्रतिनिधी : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीला सुरू आहे. राज्यात लोकसभा निवडणुक संपण्याचा मार्गावर आहे. १३ मे २०२४ रोजी सोमवारी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. चौथ्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील ३ मतदारसंघात सोमवारी मतदान पार पडणार आहे. पुण्यातील पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान पार पडणार आहे. बारामती मतदारसंघात झालेल्या मतदानात २ हजार मतदान केंद्रावर ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाल्याचे आढळून आले. त्यामुळे प्रशासनाने जास्तीत जास्त नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.


सम्बन्धित सामग्री