मुंबई: भारतीय महिला संघाने 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत आयर्लंडला हरवलं आहे. भारतीय महिला संघाने आयर्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करत 435 धावांचा डोंगर उभारला. 435 धावा या महिला एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासात सर्वात जास्त धावसंख्या आहे.
प्रथम फलंदाजी करत भारतीय महिला संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. भारतीय कर्णधार स्म्रिती मंधानाने सुरुवातीपासूनच आयर्लंडच्या गोलंदाजांना बॅकफूटवर आणले. तिने 39 चेंडूत तिचे अर्धशकात पूर्ण केलं. तिच्या नंतर तिची सलामीवीर साथीदार प्रतिका रावळने 52 चेंडूत अर्धशकात पूर्ण केले. अर्धशतक पूर्ण केल्यावर दोन्ही फलंदाजांनी सुसाट फलंदाजी केली.
स्म्रितीने 70 चेंडूत तिने आपले शतक पूर्ण केलं. तिने हरमनप्रीत कौरचा भारतासाठी सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम मोडला. स्म्रितीने 80 चेंडूत 135 धावा धावा केल्या. 135 धावांच्या या खेळीत 12 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. मंधाना आणि रावळने 233 जोडल्या. प्रतीका रवाळने 100 चेंडूत तिचे शतक पूर्ण केले. तिने 129 चेंडूत 154 धावांची खेळी केली.
तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या रिचा घोषनेदेखील आक्रमक फलंदाजी करत 42 चेंडूत 59 धावा केल्या. उर्वरित फलंदाजांमध्ये तेजल हसबनीस 28, हरलीन देओल 15 तर जेमिमा रॉड्रिग्सने 4 धावा केल्या.
फलंदाजी करताना आर्लंडचा संघ मोठी कामगिरी करू शकला नाही. आयर्लंडचा संघ 131 धाववांवर सर्वबाद झाला. भारतीय संघाकडून दीप्ती शर्मा 3, तनुजा कंवर 2 तर टिटास साधू, सायली सातघरेआणि मनी मिनूने प्रत्येकी 1 गडी बाद केला. भारताने हा सामना 304 धावांच्या फरकाने हा जिंकला आणि भारतीय महिला संघाच्या इतिहासात सर्वात जास्त धावांच्या फरकाने जिंकलेला सामना झाला.
प्रतीका रावळला तिच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कारने सन्मानित केले गेले.