Tuesday, July 02, 2024 09:15:19 AM

Double increase in dengue patients in Chhatrapati
छत्रपती संभाजीनगरात वर्षभरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये दुपटीने वाढ

छत्रपती संभाजीनगरमध्ये डेंग्यूबाधित रुग्णच्या संख्येत दरवर्षी वाढ होत चालली आहे. शहरात २०२२ मध्ये २९३ डेंग्यू रुग्णांची नोंद झाली होती.

छत्रपती संभाजीनगरात वर्षभरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये दुपटीने वाढ
Dengue patient

छत्रपती संभाजीनगर, १६ मे २०२४, प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगरमध्ये डेंग्यूबाधित रुग्णच्या संख्येत दरवर्षी वाढ होत चालली आहे. शहरात २०२२ मध्ये २९३ डेंग्यू रुग्णांची नोंद झाली होती. २०२३ मध्ये बाधित रुग्णसंख्या ६६६ म्हणजेच दुपटीवर जाऊन पोहोचली आहे. तर, जिल्ह्यात २०२२ मध्ये १०८ रुग्ण होते, ते २०२३ मध्ये ४१५ विक्रमी वाढ झाल्याची नोंद जिल्हा आरोग्य विभागाने घेतली. डेंग्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी दरवर्षी १६ मे राष्ट्रीय डेंग्यू दिन पाळला जातो. मात्र, यानंतरही रुग्णसंख्या वाढत आहे. शहरी व दाट लोकवस्तीच्या भागात डेंग्यूच्या आजाराचे प्रमाण अधिक असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी दिली.  

नुकतीच अमेरिकेत पसरलेल्या डेंग्यूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने डेंग्यूवरील दुसऱ्या लसीला बुधवारी मान्यता दिली. त्यामुळे साथीच्या या आजाराविरोधात लढण्यासाठी आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. जपानच्या 'टाकेडा' या औषधनिर्मिती कंपनीने विकसित केलेल्या लसीचे नाव 'डेंगा' (Qdenga) असे आहे. विशेषतः डेंग्यूप्प्रभावित देशांतील ते १६ या वयोगटातील रुग्णांना ही लस देण्याची शिफारस करण्यात आली आहे.


सम्बन्धित सामग्री