Monday, September 09, 2024 02:19:21 PM

स्वप्नीलच्या व्हायफळ गप्पा ऐकल्या का?

स्वप्नीलच्या व्हायफळ गप्पा ऐकल्या का

अभिनेता स्वप्नील जोशी हा कायम विविध माध्यमांवरून वरून बोलताना  दिसतो मग त्या मुलाखती असो किंवा पॉडकास्ट ! स्वप्नील ने नुकतीच व्हायफळ पॉडकास्ट ला एक खास मुलाखत दिली आणि गंमत अशी की व्हायफळ पॉडकास्ट च्या अमृत महोत्सवी भागात स्वप्नील ने या दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. 

स्वप्नील ने अगदी पहिल्या बाल भूमिकेपासून ते येणाऱ्या नवीन प्रोजेक्ट पर्यंत च्या अनेक गोष्टी इकडे सांगितल्या आहेत. आयुष्यात आपण फोन आपल्या जवळच्या लोकापासून किती दूर जातोय याकडे स्वप्नील चा बघण्याच्या दृष्टीकोन असो किंवा त्याचा बालपणीच्या घरातल्या आठवणी अश्या सुफळ संपूर्ण गप्पा व्हायफळ मध्ये तुम्हाला अनुभवता येतील !

स्वप्नील आगामी " नवरा माझा नवसाचा २ " मध्ये दिसणार असून येणाऱ्या काळात त्याचे अजून नवनवीन प्रोजेक्ट्स येणार आहेत आणि तो प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. या वर्षाची सुरुवात त्याने निर्माता म्हणून केली पण निर्मिती सोबतीने तो अभिनेता म्हणून काम करणार आहे. 

रामायण, साबुदाणा खिचडी आजीच्या आठवणी, माझं गाव आणि आयुष्य अश्या वैविध्यपूर्ण गप्पा आणि स्वप्नील चा मनमोकळा संवाद गप्पा गाणी नक्की अनुभवा ! स्वप्नील च्या या व्हायफळ गप्पा नक्कीच प्रेक्षकांना मोहित करून जातील यात शंका नाही ! 
 


सम्बन्धित सामग्री