ऑस्कर-नामांकित आणि बाफ्टा-विजेता चित्रपट निर्माता शेखर कपूर 'एबोनी मॅक्वीन' या संगीतमय वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून ज्यात शेरॉन डी क्लार्क, अवंतिका आणि थॉमस स्मिथ मुख्य भूमिकेत आहेत. या अर्ध-आत्मचरित्रात्मक चित्रपटाचे संगीत ऑस्कर विजेते संगीतकार ए.आर. रहमान यांनी दिले आहे तर या चित्रपटाचे सह-लेखक तसेच सह-निर्माते डेव्ह स्टीवर्ट हे गाणी तयार करत आहेत.२०२५ मध्ये याला सुरुवात होणार आहे.
स्टीवर्टच्या सुरुवातीच्या जीवनापासून प्रेरणा घेऊन शेखर कपूर दिग्दर्शित मुख्य पात्र चार्ली मॅकगार्वे यांच्याभोवती फिरते जो प्रो फुटबॉलर बनण्याचे स्वप्न पाहतो परंतु विनाशकारी दुखापतीमुळे त्याच्या आशा भंग पावल्या आहेत. त्याच्या आजूबाजूचे जग विस्कटले असूनही, त्याला संगीत तयार करण्याची जादू कशी कळते या कथेतून त्याचा प्रवास उलगडणार आहे.
शेखर कपूर सध्या भारतात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत असून ते जगभरातील सर्वाधिक मागणी असलेले चित्रपट निर्माता म्हणून स्थापित झाले आहेत. त्याच्या 'बँडिट क्वीन', 'एलिझाबेथ' किंवा २०२२ मधील 'व्हॉट्स लव्ह गॉट टू डू विथ इट?' आणि इतर अनेक चित्रपटांनी त्याला बाफ्टा पुरस्कार आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार यांसारखे अनेक प्रमुख पुरस्कार मिळवून दिले आहेत.
एबोनी मॅक्वीन' व्यतिरिक्त शेखर कपूर त्याच्या आगामी रिलीज 'मासूम...द नेक्स्ट जनरेशन' साठी तयारी करत आहे, ज्यामध्ये त्यांची मुलगी कावेरी कपूरचे पदार्पण होईल. त्यांची अलीकडेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, गोवा (IFFI) च्या ५५ व्या आणि ५६ व्या आवृत्तीचे महोत्सव संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.