Saturday, August 03, 2024 02:22:40 PM

बिग बॉस OTT 3 मध्ये अनिल कपूरच्या शैलीने विकी कौशलला केलं प्रभावित

'बिग बॉस OTT 3'  हे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे आणि अलीकडील भागही त्याला अपवाद नाही.

बिग बॉस ott 3 मध्ये अनिल कपूरच्या शैलीने विकी कौशलला केलं प्रभावित

'बिग बॉस OTT 3'  हे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे आणि अलीकडील भागही त्याला अपवाद नाही. अनिल कपूरने होस्ट केलेल्या वीकेंड का वार एपिसोडमध्ये विकी कौशल आणि एमी विर्क त्यांच्या आगामी 'बॅड न्यूज' चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसले. अनिल कपूरने विकी कौशलला थक्क करून सोडलं

विकीने त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपटातील 'तौबा तौबा' गाणे अनिल कपूरला समर्पित केले आणि हा क्षण खास ठरला ! विकीने अनिलला 'तौबा तौबा' ची  झलक दाखवून तर दिली पण हे दोघे या गाण्यावर थिरकले.


 

'बिग बॉस ओटीटी 3' होस्ट म्हणून पदार्पण केलेल्या अनिल कपूरने शोमध्ये वेगळीच जादू निर्माण केली आहे. त्याचा फिटनेस आणि स्टाइल अनेकदा त्याच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.  शो होस्ट करण्याव्यतिरिक्त अनिल कपूर 'सुभेदार' मध्ये निर्दोष परफॉर्मन्स देण्यासाठी सज्ज आहे, जो त्याचा दिग्दर्शक सुरेश त्रिवेणीसोबतचा पहिला प्रोजेक्ट आहे. तो YRF च्या गुप्तचर विश्वाचा एक भाग असल्याचीही अफवा आहे.


सम्बन्धित सामग्री