Saturday, August 03, 2024 06:35:14 AM

अमृता खानविलकरला अंबानी च्या लग्नाचं खास निमंत्रण !

हिंदी-मराठी इंडस्ट्रीत जोरदार चर्चेत असलेलं नाव म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर ! 2024 वर्षात अमृता अनेक बॉलिवुड प्रोजेक्ट्स मधून दिसणार असून आगामी वर्षात ती अनेक नवनवीन भूमिका साकारणा

अमृता खानविलकरला अंबानी च्या लग्नाचं खास निमंत्रण

 

हिंदी-मराठी इंडस्ट्रीत जोरदार चर्चेत असलेलं नाव म्हणजे अभिनेत्री अमृता खानविलकर ! 2024 वर्षात अमृता अनेक बॉलिवुड प्रोजेक्ट्स मधून दिसणार असून आगामी वर्षात ती अनेक नवनवीन भूमिका साकारणार आहे. सध्या सोशल मीडिया वर चर्चा आहे ती म्हणजे अंबानी यांच्या लग्न सराईची अश्यातच अभिनेत्री अमृता खानविलकर हिला अंबानी कुटुंबाकडून या लग्नसोहळ्याचं विशेष निमंत्रण देखील आल्याचं कळतंय. बॉलिवुड पासून हॉलिवूड पर्यंत अनेक कलाकार या लग्न सोहळ्यात येणार असल्याचा बातम्या असताना आता आपल्या मराठमोळ्या अभिनेत्रीला देखील या लग्न सोहळ्याचं खास निमंत्रण आलं आहे.

अमृता तिच्या वैविध्यपूर्ण भूमिका मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना आता ती या लग्न सोहळ्यात सहभागी होणार का? ही उत्सुकता सगळ्यांना आहे. राधिका आणि अनंत अंबानी यांचा लग्न सोहळा 12 ते 15 जुलै रोजी संपन्न होणार असून अनेक बडे कलाकार सुद्धा याला उपस्थित राहणार आहेत. 

राधिका आणि अनंत अंबानी यांच्या बिग फॅट वेडिंगच्या चर्चा सगळीकडे सुरू असून अमृता देखील या लग्नाचा भाग होणार आहे.


सम्बन्धित सामग्री