Sunday, March 30, 2025 02:50:40 AM

माझ्याबरोबर लग्न करणार का?

संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या अभिनयाने वेड लावणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच चर्चेत असते.

माझ्याबरोबर लग्न करणार का

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या अभिनयाने वेड लावणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच चर्चेत असते. सध्या प्राजक्ता तिच्या फुलवंती या चित्रपटामुळे चर्चेत आहे. निर्माती म्हणून तिचा हा पहिलाच चित्रपट असल्याने प्रेक्षकांनी या चित्रपटावर भरभरून प्रेम केले आहे. फुलवंती थिएटर आणि ओटीटीवरही धुमाकूळ घालत आहे.

प्राजक्ता माळीवर प्रेम करणाऱ्यांची कमी नाही. प्राजक्ताचे क्रेझी फॅन्सही पाहायला मिळत आहेत. तिच्यावर वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांचीही कमी नाही. प्राजक्ताने इंस्टाग्रामवर एक प्रश्न उत्तराचे सेशन घेतले. या सेशनला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यातच एका क्रेझी फॅनने तु माझ्याबरोबर लग्न करणार  का ?  असा भन्नाट प्रश्न विचारला आहे. त्याचबरोबर तुझ्यामुळे मी पण लग्न केलं नाही असे देखील प्राजक्ताच्या चाहत्याने म्हटले आहे. उत्तरादाखल प्राजक्ताने माझं काही खरं नाही, तुम्ही करून टाका त्याचबरोबर जे तिच्यामुळे लग्नासाठी थांबलेत त्यांनाही हा मेसेज तिने दिला आहे आणि त्यासोबतच हसण्याचा इमोजी शेअर केला आहे. चाहत्याचा हा प्रश्न आणि त्यावर प्राजाक्ताने दिलेले उत्तर चांगलेच चर्चेत आहे. समाज माध्यमावर या प्राजक्ताच्या सेशनने चांगलेच लक्ष वेधून घेतले आहे.  

प्राजक्ताचा मोठा चाहता वर्ग आहे. तिच्यावर प्रेम करणाऱ्यांची कमी नाही. तिच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी प्रेक्षकांना समजण्यासाठी ती सोशल मीडियावर सक्रिय असते. तिथे ती तिच्या आयुष्यातील सगळ्या शेअर करत असते.  


सम्बन्धित सामग्री