मुंबई: 2025 अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे आणि अश्यातच अभिनेत्री अमृता खानविलकर हिने 2024 वर्ष तिच्या साठी कसं होत हे शेयर केलं ! अमृताने 2024 वर्षात अनेक कमालीचे बॉलिवूड प्रोजेक्ट्स केले आणि त्याला प्रेक्षकांची तितकीच पसंती देखील मिळाली.
बॉलिवुड मध्ये अमृताने विविध विषयांवर काम केलं आणि त्या भूमिका खास केल्या आता अर्थात या भूमिका दिसायला सोप्प्या असल्या तरी त्या तितक्याच आव्हानात्मक होत्या ! 2024 मध्ये अमृताने खऱ्या अर्थाने ओटीटी बॉलिवुड गाजवल आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. लुटेरे, चाचा विधायक है हमारे 3, 36 डे बडे हिंदी प्रोजेक्ट्स अमृताने केले.
अमृता कायम चर्चेत असलेली अभिनेत्री राहिली आहे आणि तिने हे या वर्षात देखील सिद्ध केल. " वर्ल्ड ऑफ स्त्री" सारखा शास्त्रीय आणि अर्ध-शास्त्रीय संगीत आणि नृत्याची अनोखी मैफिल तिने या वर्षात प्रेक्षकांना दिली. मराठी सिनेमा आणि अमृताच नात हे अतूट आहे आणि म्हणून 2024 वर्षात तिने वेगळ्या धाटणीच्या भूमिका असलेले चित्रपट केले. लाईक अँड सबस्क्राईब , धर्मरक्षक संभाजी महाराज या चित्रपटातून तिने कमालीच्या भूमिका साकारल्या.
अमृताच काम इथेच थांबत नाही तर तिने या वर्षात टेलिव्हीजन विश्वात देखील आपली छाप पाडली नेहमी पेक्षा वेगळ पण तितकच कठीण काम करण्यासाठी ती ड्रामा ज्युनियर्स साठी जज च्या भूमिकेत बसली. कामाच्या दृष्टीने अमृताने अनेक गोष्टी खास प्रोजेक्ट्स तर केले पण तिने मुंबईत स्वतःच हक्काचं घर देखील घेतलं.
आगामी वर्षात अमृता आता काय काय प्रोजेक्ट्स करणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.