बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे आणि ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ यांच्याविरोधात उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये मोठा गुन्हा दाखल झाला आहे. ‘ह्युमन वेल्फेअर क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ या संस्थेद्वारे अनेक गुंतवणूकदारांची तब्बल 9.12 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली असून, चाहते आणि गुंतवणूकदार आश्चर्यचकित झाले आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण?
संबंधित संस्थेने हरियाणा, लखनऊ आणि इतर राज्यांमध्ये फसवणुकीचा व्यवसाय सुरू केला होता. मल्टी-लेव्हल मार्केटिंगच्या (MLM) मॉडेलचा वापर करून लोकांना मोठ्या परताव्याचं आमिष दाखवण्यात आलं. अनेकांनी आकर्षक योजनांवर विश्वास ठेवून गुंतवणूक केली, मात्र संस्थेचे संचालक अचानक फरार झाले.याप्रकरणी बॉलिवूड कलाकारांसह इतर 11 जणांवर देखील हरियाणातील सोनीपत येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, श्रेयस तळपदे आणि आलोक नाथ यांनी या योजनेच्या जाहिरातींमध्ये सक्रिय भूमिका बजावली होती.
हेही वाचा: राज्यात पहिल्यांदाच सोशल वॉर रूम! मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी रणनीती
या प्रकरणात अभिनेता सोनू सूदही एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अद्याप कोणत्याही कलाकाराने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलेली नाही.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
गुंतवणूकदारांचे पैसे गायब – मोठी आर्थिक फसवणूक उघड
ही सोसायटी तब्बल सहा वर्षे लोकांकडून पैसे उकळत होती. हळूहळू संस्थेने 250 हून अधिक शाखा उघडल्या आणि 50 लाख लोकांना आपल्या जाळ्यात ओढलं. मोठ्या प्रचार-प्रसारामुळे सामान्य नागरिकांनी गुंतवणूक केली, मात्र आता कोट्यवधी रुपये बुडाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, बॉलिवूड कलाकारांची भूमिका स्पष्ट होण्याची प्रतीक्षा आहे. लोकांचे पैसे परत मिळणार का, गुन्हेगारांना शिक्षा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: कुंभमेळ्यात आज तिसरं अमृत स्नान , कोट्यवधी भाविक स्नान करणार!
हा घोटाळा बॉलिवूड कलाकारांसाठी अडचणींचा ठरणार का? तुमचे मत काय?