मुंबई : श्रद्धा कपूर ही हिंदी सिनेसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. श्रद्धा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.नुकतीच तिने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्या पोस्टवर प्रेक्षकांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.
हेही वाचा : सुबोध भावे दिग्दर्शित चित्रपटातील ‘ऋतु वसंत’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
नुकत्याच पार पडलेल्या ‘रेड सी फिल्म फेस्टिवल’ या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात अनेक हॉलीवूड कलाकारांसह हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारही उपस्थित होते. त्या कार्यक्रमाला श्रद्धाने हजेरी लावली होती. त्यात तिने मल्टिकलर गाऊन घातला होता. मल्टिकलर गाऊनमध्ये श्रद्धाचा हॉट लूक प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
अभिनेत्री श्रद्धा कपूला ‘आशिकी 2’ या चित्रपटामुळे सिनेसृष्टीत ओळख मिळाली. श्रद्धा कपूर ही दिग्गज अभिनेता शक्ती कपूर यांची मुलगी आहे. तिला चित्रपटसृष्टीत सध्या 14 वर्षे पूर्ण झाली आहेत. श्रद्धाने अनेक हिट चित्रपट केले आहेत. 2010 मध्ये तिने ‘तीन पत्ती’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले.