Friday, March 28, 2025 12:33:31 AM

‘छावा’मध्ये संतोष जुवेकरची दमदार एंट्री! विकी कौशलसोबतचा खास बॉण्ड कसा जुळला?

संतोष जुवेकर ‘छावा’मध्ये रायाजीची भूमिका साकारणार आहे. एका मुलाखतीत त्याने या भूमिकेबद्दल आनंद व्यक्त करत अनेक खास आठवणी शेअर केल्या.

‘छावा’मध्ये संतोष जुवेकरची दमदार एंट्री विकी कौशलसोबतचा खास बॉण्ड कसा जुळला

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत झळकणार आहे. मात्र, यासोबतच एक मराठमोळा अभिनेता देखील या भव्य ऐतिहासिक चित्रपटात आपली खास भूमिका साकारताना दिसणार आहे – तो म्हणजे संतोष जुवेकर!

संतोष जुवेकर ‘छावा’मध्ये रायाजीची भूमिका साकारणार आहे. एका मुलाखतीत त्याने या भूमिकेबद्दल आनंद व्यक्त करत अनेक खास आठवणी शेअर केल्या. शूटिंगदरम्यान विकी कौशलसोबत त्याचं उत्तम मैत्रीचं नातं तयार झालं.एका प्रसंगात विकी कौशलने स्वतः प्रोडक्शनला सांगून संतोषला सेटवर बोलावले. शूटिंग नसतानाही फक्त मैत्रीसाठी विकीने त्याला बोलावल्याचं संतोषने सांगितलं. सेटवर विकीने सर्वांसाठी घरून खास जेवण मागवलं होतं, आणि त्याचा मित्रभाव जाणवून गेला.


हेही वाचा 👉🏻👉🏻राज ठाकरेंच्या भेटीनंतर ‘छावा’च्या दिग्दर्शकांची स्पष्टोक्ती

“एक दिवस माझं नावही व्हॅनिटीवर असेल!”
विकीच्या फूड व्हॅनिटीवर “स्पेशली क्रिएटेड फॉर मिस्टर विकी कौशल” असे लिहिलेले पाहून संतोषने सहज म्हटले, “एक दिवस माझं नावही असं लिहिलेलं असेल.” त्यावर विकीने हसतच उत्तर दिलं, “अरे… पक्का होगा!”

हेही वाचा 👉🏻👉🏻 महाकुंभात इंटरनेटवर व्हायरल होणारी मोनालिसा चित्रपटात भूमिका साकारणार

या चित्रपटाद्वारे संतोष जुवेकर एक ऐतिहासिक भूमिका साकारणार असून, ‘छावा’मध्ये त्याचा अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत!

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
 


सम्बन्धित सामग्री