नुकताच, होळीच्या पार्श्वभूमीवर सलमान खानच्या आगामी चित्रपटातील ‘बम बम भोले’ या गाण्याचा टीझर रिलीज झाला आहे. या बहुप्रतिक्षित गाण्याचा टीझर रिलीज होताच सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. गाण्याची सुरुवात एका अशा जबरदस्त रॅपने होते, ज्यामुळे गाण्यातील उत्साह आणखी वाढते. गाण्यातील रंगीबेरंगी दृश्ये आणि दमदार बीट्समुळे हे गाणे होळीसाठी दर्जेदार बनवते. ‘बम बम भोले’ या गाण्याच्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता अजून वाढवली आहे. गाण्याचे टीझर पाहताच चाहते आतुरतेने ‘बम बम भोले’ या गाण्याची वाट पाहत आहे.
हेही वाचा: ही कोण आहे माहितीये? ऐश्वर्या राय..? मुळीच नाही.. ही तर पाकिस्तानची..
'बॉम्बे लोकल' म्युजिक यांनी लिहिलेला रॅप:
"बम बम भोले" मध्ये शेक्सपियर, वाय-ॲश आणि हुसेन (बॉम्बे लोकल) यांनी लिहिलेला आणि सादर केलेला शक्तिशाली रॅप आहे, जो गाण्याच्या उत्साही वातावरणात आणखी भर घालतो. विशेष म्हणजे या रॅपमध्ये किड रॅपर्स भीमराव जोगू, सरफराज शेख आणि फैजल अन्सारी (धारावी ड्रीम प्रोजेक्ट) देखील असतील, जे ट्रॅकमध्ये एक उत्साही वातावरण जोडते.
सलमान खानची गाण्यामध्ये एन्ट्री:
गाण्यातील बीट्स सुरु होताच, सलमान खान त्याच्या ठरलेल्या स्वॅगने दमदार एन्ट्री करतो. त्याची दबंग शैली त्याच्या प्रत्येक हालचालीतून दिसून येते, ज्यामुळे हा होळीचा ट्रॅक आणखी दमदार होतो. ऊर्जा, रंग आणि संगीत यांची जबरदस्त जोडी 'बम बम भोले' या वर्षीच्या होळीतील सर्वात धमाकेदार गाणे बनवण्यासाठी सज्ज आहे. 'बम बम भोले' या गाण्यामध्ये प्रेक्षकांना दमदार डान्स सीक्वेन्स, दमदार बीट्स आणि रंगांचा धमाका पाहायला मिळेल जे प्रेक्षकांना या गाण्यावर नाचण्यास भाग पाडेल.
हेही वाचा: Famous Women Centric Films: झिम्मा, बाईपण भारी देवा, क्वीन... 'या' आहेत प्रसिद्ध महिला-प्रधान चित्रपट
संगीतकार प्रीतम यांनी संगीत दिले असून, साजिद नाडियादवाला यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे, तर ए.आर. मुरुगदास यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हे गाणे मंगळवारी रिलीज होणार आहे. त्यामुळे संगीत, ताल आणि सलमान खानचा अप्रतिम डान्स मूव्ह्स पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढत आहे.