Thursday, March 13, 2025 10:48:08 PM

खासदार उदयनराजे राहुल सोलापूरकरावर संतापले; काय म्हणाले?

सध्या अभिनेता राहुल सोलापूरकर वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

खासदार उदयनराजे राहुल सोलापूरकरावर संतापले काय म्हणाले

नवी दिल्ली : सध्या अभिनेता राहुल सोलापूरकर वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याने छत्रपती शिवाजी महाराजांबदद्ल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. छत्रपती शिवरायांनी त्यांच्या आयुष्यात कधी स्वत: स्वार्थ पाहिला नाही. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी त्यांनी आयुष्य झिजवले. त्यांच्याबद्दल अभद्र बोलणाऱ्या राहुल सोलापूरकर याला दिसेल तिथे ठेचून काढा. खरे तर अशा लोकांना गोळ्या घातल्या पाहिजेत अशा शब्दात शिवरायांचे तेरावे  वंशज तथा साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाला लाच देऊन आग्र्यातून निघून गेले होते असे वादग्रस्त वक्तव्य राहुल सोलापूरकर याने केले होते. शिवाजी महाराज यांच्याबद्दल असे वक्तव्य करणे अत्यंत चुकीचे आहे. सोलापूरकर याने महाराजांबदद्ल वक्तव्य केल्यानंतर राज्यभरातून त्याच्यावर संताप व्यक्त होत आहे. सगळीकडून झालेल्या टीकेनंतर त्याने दिलगिरी व्यक्त केली. या दिलगिरीतून त्याने वाजदावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल सोलापूरकर याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

 हेही वाचा :  गनिमी काव्याने आंदोलन करणार; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलेल्या राहुल सोलापूरकर याला गोळ्या झाडून मारलं पाहिजे. शिवाजी महाराज औरंगजेबाला लाज देऊन आग्र्यातून सुटले म्हणणारा सोलापूरकर औरंगजेबाची अवलाद असल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या सोलापूर याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी उदयनराजेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

हेही वाचा : साताऱ्यातील बड्या नेत्याच्या घरी छापेमारी

 

सोलपूरकरांनी महाराजांबदद्ल केलेलं वक्तव्य

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपूर्ण इतिहासामध्ये आग्र्याच्या सुटकेला मोठं महत्व आहे. मात्र, राहुल सोलापूरकरांनी मुलाखतीत वादग्रस्त दावा केला आहे. औरंगजेबाने महाराजांना नजरकैदेत ठेवलं होतं. आग्र्यातून सुटकेसाठी पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं. महाराज औरंगजेबाच्या सरदारांना लाच देऊन आग्र्याहून महाराष्ट्रात परतले. आग्र्यातून सुटकेचा इतिहास आपण अभिमानाने सांगतो.


सम्बन्धित सामग्री