मुंबई : बहुरंगी अभिनेता अतुल परचुरे यांचं ५७ व्या वर्षी निधन झालं. अतुल परचुरे यांनी नाटक, चित्रपट आणि टीव्ही मालिका या तिन्ही प्रकारांमध्ये छाप पाडली होती.
अतुल परचुरे यांनी पु. ल. देशपांडे यांची व्यक्तिरेखा मालिकांमध्ये हुबेहुब साकारली होती. अतुल परचुरे यांचं नातीगोती हे नाटक चांगलंच गाजलं होतं. यावेळी त्यांच्याबरोबर दिलीप प्रभावळकर आणि रिमा लागू असे दिग्गज कलाकार होते. 'वासूची सासू', 'प्रियतमा', 'तरुण तुर्क म्हातारे अर्क' या नाटकांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी सह-अभिनेता म्हणून काम केलं. 'सलाम-ए-इश्क', 'पार्टनर', 'ऑल द बेस्ट: फन बिगिन्स', 'खट्टा मीठा', 'बुढ्ढा होगा तेरा बाप' अशा हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली. याशिवाय 'जागो मोहन प्यारे' मालिकेतील त्यांच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं.
यकृतामध्ये पाच सेमी. लांबीची कर्करोगाची गाठ झाली होती. यावर उपचार सुरू असताना स्वादुपिंडावर परिणाम झाला आणि चुकीच्या उपचारांमुळे तब्येत खालावली. यानंतर डॉक्टर बदलून उपचार सुरू केले, अशी माहिती अतुल यांनी एका मुलाखतीत दिली होती.