Tuesday, April 15, 2025 03:16:13 AM

'हम आपके हैं कौन' चित्रपटासाठी माधुरी नव्हे तर 'या' अभिनेत्रीला दिली होती पसंती; दिग्दर्शकाने सांगितला किस्सा

'हम आपके हैं कौन' चित्रपटातील निशाच्या भूमिकेसाठी दिग्दर्शकाने पहिली पसंती कोणाला दिली होती हे तुम्हाला माहिती आहे का?

हम आपके हैं कौन चित्रपटासाठी माधुरी नव्हे तर या अभिनेत्रीला दिली होती पसंती दिग्दर्शकाने सांगितला किस्सा

मुंबई : बॉलिवूडचे 90 च्या दशकातील लोकप्रिय दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचा 'हम आपके हैं कौन' हा चित्रपट सुपरहिट झाला होता. 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश करणारा बॉलिवूडचा हा पहिला चित्रपट मानला जातो. भारतातच नव्हे तर परदेशातही या चित्रपटाने भुरळ घातली होती. या सिनेमाने परदेशातही नफा कमावला होता. आजही 'हम आपके हैं कौन' या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्साह पाहायला मिळतो.  


'हम आपके है कौन' या चित्रपटातील निशा-प्रेमची जोडी लोकप्रिय झाली होती. ही भूमिका सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दिक्षित आणि सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान या दोघांनी साकारली होती. बॉलिवूडच्या सुपरहिट जोड्यांमध्ये आजही निशा-प्रेम या जोडीचे नाव आवर्जून घेतले जाते. आजही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. माधुरी आणि सलमान या भूमिकांमध्ये खूपच शोभून दिसले होते. परंतु निशाच्या भूमिकेसाठी दिग्दर्शकाने पहिली पसंती कोणाला दिली होती हे तुम्हाला माहिती आहे का? 

हेही वाचा : पालकमंत्रिपदावरुन शिवसेना - राष्ट्रवादीत वाढला दुरावा

नुकतच सूरज बडजात्या आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांनी इंडियन आयडल 15 या रिअॅलिटी शोमध्ये उपस्थिती दर्शवली होती. यावेळी 'हम आपके हैं कौन' या चित्रपटासाठी अभिनेत्री करिश्मा कपूर हिला पहिली पसंती दिल्याचा खुलासा दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी एक खुलासा केला. याचे कारणही त्यांनी सांगितले. 
 

सूरज बडजात्या म्हणाले की, करिश्माने मला प्रेम कैदी दाखवण्यासाठी फोन केला. प्रेम कैदी हा करिश्माचा पहिला चित्रपट होता. तो चित्रपट बडजात्या
पाहून आले. त्यानंतर घरी आल्यावर त्यांनी वडिलांना करिश्माचा चित्रपट पाहिल्याचे सांगितले. करिश्मामध्ये खूप क्षमता आहे. आपण 'हम आपके हैं कौन'  चित्रपट लिहत आहोत तर त्यासाठी आपण करिश्माला फोन करूया असे सूरज यांनी त्यांच्या वडिलांनी विचारले. 'हम आपके हैं कौन' या चित्रपटातील निशाच्या भूमिकेसाठी बडजात्या करिश्माचा विचार करत होते. परंतु यावेळी सूरज यांना त्यांचे वडिल राजकुमार बडजात्या यांनी एक गोष्ट समजावून सांगितली. 

हेही वाचा : ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरु; पहिल्या टप्प्यात होणार राम जन्मभूमी अयोध्या दर्शन


करिश्मा अजून लहान आहे. मोहनीशजींच्या बाळाला स्वीकारण्यासाठी ती तिच्या प्रेमाचा त्याग करण्यास तयार आहे, असे आपल्याला दाखवायचे आहे. एका तरुण मुलीवर हे खूप मोठे ओझे होईल, म्हणूनच आपल्याला अशा व्यक्तीची आवश्यकता आहे जी जबाबदारी तिच्या खांद्यावर पेलवू शकेल. 

सूरज यांनी सांगितलेल्या या किश्श्यानंतर करिश्मालाही आश्चर्य वाटले ती म्हणाली की जर ती वयाने मोठी असती तर ती आज 'हम आपके हैं कौन!' या चित्रपटाची नायिका असती. 


सम्बन्धित सामग्री