गुरुवार दि. ६ जून रोजी चंदीगड विमानतळावर कुलविंदर कौर नावाच्या सीआयएसएफ महिला सुरक्षारक्षकाने अभिनेत्री खासदार कंगणा राणौत हिच्या कानशिलात लगावली. ही बातमी पसरताच हिंदी तसेच तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील बऱ्याच कलाकारांनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली.
शबाना आझमी ,अनुपम खेर , मिका सिंग , शेखर सुमन आणि त्यांचा मुलगा अध्ययन सुमन यांच्यासह बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी या विषयावर आपली मते मांडली. काहींनी कंगनाच्या बाजूने आवाज उठवला तर काहींनी तिच्या सोबत घडलेल्या कृत्याचे समर्थन केले.
कोण काय म्हणाले पाहुयात..
विशाल ददलानी, संगीतकार -
मी कधीही हिंसेचे समर्थन करत नाही
मात्र, सीआयएसएफ जवानाच्या रागाचे कारण मी समजू शकतो.
सीआयएसएफ जवानावर कोणतीही कारवाई केल्यास, त्यांना नोकरीची संधी मिळेल, याची मी खात्री करेन.
अभिनेत्री शबाना आझमी - जर सुरक्षारक्षकांनीच जर कायदा आपल्या हातात घेण्यास सुरुवात केली
तर आपल्यापैकी कुणीच सुरक्षित नाही.
नाना पाटेकर : जो प्रकार घडला तो दुर्दैवी आहे.
असं कुणाच्याही बाबतीत होणं चांगलं नाही. मुळीच चांगलं नाही.
जे घडलं ते घडायला नको होतं.
अनुपम खेर म्हणाले, "ये फारच दुर्दैवी आहे. असं व्हायला नको होतं. विशेषत: अशा व्यक्तीकडून जी स्वत: एक सुरक्षारक्षक आहे. मला वाटतं भारतातील महिलांनी यावर प्रतिक्रिया दिली पाहिजे. केवळ यासाठी नाही की कंगना एक खासदार आहे पण यासाठी कारण ती एक महिलाही आहे."
सिनेसृष्टीच्या या वागण्यामुळे कंगनाने संताप व्यक्त केलाय.
"प्रिय फिल्म इंडस्ट्री, माझ्यावर एअरपोर्टवर जो हल्ला झाला तो एकतर तुम्ही साजरा करताय किंवा त्याबद्दल काहीच बोलत नाही असं तुम्ही ठरवलं आहे का ? पण लक्षात ठेवा तुम्ही किंवा तुमची मुलं जगात कुठेही रस्त्यावर नि:शस्त्र फिरत असाल आणि एखाद्या इस्रायली किंवा पॅलेस्टाईनने तुमच्यावर किंवा तुमच्या मुलावर हल्ला केला तेव्हाही मी तुमच्या हक्कांसाठी लढा देईन."