६ सप्टेंबर, २०२४, पुणे : अभिनेता भूषण प्रधान याने पुण्यात नवीन घर घेतलं आहे. याचे फोटो त्याने समाजमाध्यमांवर पोस्ट केले आहेत.
नुकताच भूषण जुनं फर्निचर आणि घरत गणपती या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
यानंतर आता पुन्हा एकदा भूषणने त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
हे घर त्याने त्याच्या आई वडिलांना भेट म्हणून दिलं आहे.
स्वतः घर घेणं ही आणखी एक स्वप्नपूर्ती असल्याचं भूषणने यावेळी म्हटलं आहे.
नवीन घराच्या पूजेचे, नातेवाईकांचे फोटो भूषणने समाजमाध्यमांवर टाकले आहेत.
या फोटोंवर कमेंट करत चाहत्यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे.