Wednesday, April 09, 2025 10:33:31 AM

अक्षय कुमारला हाउसफुल 5 च्या सेटवर डोळ्याला इजा

अक्षय कुमार स्टंट करत असताना त्याचा डोळ्याला  इजा झाली; डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला, तरीही अभिनेता चित्रपटाच्या अंतिम टप्प्यातील शूटिंगसाठी लवकर परतणार.

अक्षय कुमारला हाउसफुल 5 च्या सेटवर डोळ्याला इजा


अक्षय कुमारला हाउसफुल 5 च्या सेटवर स्टंट करत असताना डोळ्याला इजा झाली आहे. एका सेटवरील वस्तूमुळे त्याच्या डोळ्यात गंभीर दुखापत झाली. सध्या त्याच्या डोळ्याला पट्टी बांधली गेली आहे आणि त्याला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. स्टंट करत असताना अचानक सेट वरची  प्रॉपर्टी अक्षयच्या डोळ्यात गेली. त्यानंतर ताबडतोब नेत्रतज्ज्ञ डॉक्टरांना बोलवण्यात आले आणि त्यांनी त्याच्या डोळ्याला पट्टी बांधली, तसेच आराम  करण्याची सूचना देखील त्याला केली. तरीही अक्षय कुमारने शूटिंगला लवकरच परत यायचं ठरवले आहे, कारण चित्रपटाच्या चित्रीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे आणि तो विलंब टाळू इच्छितो.  

हाउसफुल 5 मध्ये अक्षय कुमार आणि रितेश देशमुख हे हापूसफूल्ल 'फ्रॅंचाईझ' मध्ये पुनः एकत्र दिसणार आहेत म्हणून सिने चाहत्यांमध्ये देखील उत्साह दिसत आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन, श्रेयस तळपदे, चंकी पांडे, जैकलीन फर्नांडीस आणि नरगिस फाखरी यांसारखे कलाकार देखील आहेत. नव्या सदस्यांमध्ये फरदीन खान, डीनो मोरिया, जॉनी लीव्हल, संजय दत्त, नाना पाटेकर, सोनम बाजवा, चित्रांगधा सिंह आणि सौंदर्या शर्मा यांचा समावेश आहे. ज्याकी श्रॉफ देखील या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.

चित्रपटाची शूटिंग युरोपमध्ये सुरू झाली होती आणि 40 दिवसांच्या शेड्यूलमध्ये न्यूकॅसल ते स्पेन, नॉर्मंडी, होंफ्लियर आणि प्लीमथपर्यंत क्रूझ जहाजावर शूटिंग केले गेले. हाउसफुल 5 दिग्दर्शित केला आहे तारुण मन्सुखानी यांनी आणि या चित्रपटाची प्रदर्शनी 6 जून 2025 रोजी होईल. हाउसफुल, हाउसफुल 2, हाउसफुल 3 आणि हाउसफुल 4 या चित्रपटांनी प्रेक्षकांचे  मनोरंजन केलं आणि मोठा व्यवसाय देखील केला. हॉउसफ़ुल्ल 5 ची देखील चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 


सम्बन्धित सामग्री