मुंबई : अभिनेता रजनीकांत यांची तब्येती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटात वेदना होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी रात्री उशिरा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोटात वेदना होत असल्याने त्यांच्या हृदयाशी संबंधित चाचण्या केल्या जाणार आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पीटीआयकडून मिळाली आहे. रजनीकांत यांच्या कुटुंबीयांकडून किंवा रुग्णालयाकडून अद्याप याबाबत अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.