मुंबई , २९ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : अभिनेत्री, नृत्यांगना अमृता खानविलकर ही नकायम तिच्या दिलखेचक अदांनी प्रेक्षकांना मोहित करत असते. तिने आजवर अनेकअफलातून भूमिका साकारून त्या अजरामर केल्या. अमृता अभिनयाच्या सोबतीने उत्तम डान्सर देखील आहे हे तिच्या सोशल मीडियावरून आणि तिच्या उत्तम नृत्यशैलीतू नेहमीच दिसत. नटरंग मधला "वाजले की बारा" असू दे किंवा चंद्रमुखी मधल "चंद्रा" अमृताने कायम तिच्या अनोख्या नृत्याने सगळ्यांना मोहित केलं. तिचं नृत्यावर असलेलं प्रेम आजही ती अनेक मुलाखती मधून व्यक्त करताना दिसते.
सध्या अमृता तिच्या बॉलिवुड प्रोजेक्ट्समधून चर्चेत आहे पण तुम्हाला माहिती आहे का अमृता अभिनयाच्या सोबतीने तिचं शास्रिय नृत्याच शिक्षण सुद्धा घेत आहे. तिच्या लयकारी अदा, नजर खिळवून ठेवणाऱ्या हूक स्टेप्स प्रेक्षकांना कायम मोहित करतात आणि अश्यातच अमृता " कथ्थक " देखील शिकते आहे.
अभिनयाच्या सोबतीने स्वतःचे छंद जोपासून त्या साठी कष्ट घेणारी अमृता आता हा डान्स फॉर्म सुद्धा शिकतेय. एवढंच नाही तर ती त्या साठी शास्त्रीयपूर्ण शिक्षण घेताना दिसतेय. अमृताच डान्स बद्दलच प्रेम हा तिच्या जिव्हाळ्याच्या विषय आहे आणि म्हणून तिने कथ्थक शिकण्याचा निर्णय घेतला आहे. अमृता नुकतीच " हिरामंडी " साठी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या सोबत दिसली होती आता हे दोघं भविष्यात सोबत काम करणार का ? हा प्रश्न देखील तिच्या चाहत्यांना पडला आहे.
या बद्दल बोलताना अमृता म्हणते " लहानपणी सगळ्यांचे स्वप्न असतेे की आपण मोठं होऊन हे करावं ही आवड जोपासावी तसचं माझं एक लहानपणीचं स्वप्न होत की आपण कथ्थक शिकावं. नृत्य म्हणजे माझ्यासाठी जीव की प्राण असा विषय होता पण लहानपणी तेवढी परिस्तिथी नसल्यामुळे मला कथ्थकच प्रशिक्षण घेता आल नाही म्हणून ही इच्छा मी आता पूर्ण करतेय आणि त्याचा खूप जास्त आनंद आहे. मंजिरी देव यांची नातसून प्रिया यांच्या कडून मी कथ्थकच प्रशिक्षण घेत आहे"