स्लीव्हलेस फॅशन ते डेनिम जमसुट शुभंकर तावडेची टॉप क्लास फॅशन
अभिनेता शुभंकर तावडे हा कायम त्याच्या वैविध्यपूर्ण भूमिका आणि कमालीच्या फॅशन स्टाईलिंगसाठी ओळखला जातो. फॅशनच्या जगात तो कायम चर्चेत असतो. रेड कार्पेट असो किंवा एथनिक लूक्स असो शुभंकर त्यांचा स्टायलिश अंदाज कायम दाखवतो. आज शुभंकरच्या टॉप ५ लूक्स बद्दल जाणून घेऊया !
ब्लॅक जॅकेट लूक
शुभंकरने फिल्मफेअर ला हजेरी लावून त्याचा रेड कार्पेटवर लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. हा ब्लॅक जॅकेट लूक फक्त शुभंकर ला स्टायलिश बनवत नसून त्याच स्टाईल स्टेटमेंट सेट करतोय.
पिंक स्लीव्हस
मुलं फारसा पिंक रंग वापरत नाही असं म्हटलं जातं पण शुभंकर याला अपवाद आहे. तो नेहमीच त्याचा फॅशन मध्ये वैविध्यपूर्ण गोष्टी करण्यावर भर देतो आणि त्यातून आलेला हा पिंक स्लीव्हस लूक ! स्लीव्हलेस कपडे घालून शुभंकर हा नेहमीच खास दिसतो यात शंका नाही.
वेलवेट ब्लॅक
असं म्हणतात जुनी फॅशन पुन्हा आली असून हल्ली त्याला एक मॉर्डन टच देऊन खास फॅशन केली जाते शुभंकरचा वेलवेट ब्लॅक लूक याचं एक बेस्ट उदाहरण आहे. वेलवेट ब्लॅक लूक मधला शुभांकरचा करारी लूक नेहमीच प्रेक्षकांना आवडत आला आहे.
डेनिम स्लीव्हलेस लूक
शुभंकर हा फॅशन आयकॉन म्हणून ओळखला जातो आणि याच कारण म्हणजे त्याचे फॅशन बरोबर काही न काही प्रयोग करण्याची त्याची सवय ! डेनिम सगळीकडे वापरला जाणारा प्रकार आहे मग ते जीन्स असो किंवा एखादं जॅकेट पण डेनिम स्लीव्हलेस जमसुट असेल तर हा लूक अजून उठावदार दिसतो. डेनिम स्लीव्हलेस जमसुट मध्ये शुभंकर त्याचा टॉप क्लास फॅशन गेम ऑन करताना दिसतोय.
ऑलिव्ह ग्रीन कोट आणि व्हाईट कुर्ती
ऑलिव्ह ग्रीन रंगाचा कोट आणि व्हाईट कुर्ती हे कमालीचा कॉम्बिनेशन हे शुभंकरच्या फॅशनेबल अंदाजात अजून भर घालत. फॅशन रंगाची संगती यांचा मेळ शुभंकर ने उत्तम जमवून आणला आहे. रंगाचं मिस मॅच कलेक्शन आणि त्यातून घडणारा हा लूक शुभंकरला रुबाबदार बनवतो !