Wednesday, June 26, 2024 05:02:51 AM

सलमान खान गोळीबार प्रकरणात आरोपींविरोधात कारवाई

सलमान खान गोळीबार प्रकरणात आरोपींविरोधात कारवाई

मुंबई, २७ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. सर्व आरोपींविरोधात मकोकाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी लॉरेंस विष्णोई गँगचे दोन शार्प शूटर विक्की गुप्ता आणि सागर पाल यांना अटक केली असून कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई आणि त्याचा भाऊ अनमोल विष्णोई यांना वाँटेड घोषित केलं आहे.

मुंबई पोलिसांनी एकूण ६ आरोपींना मकोका कायदा लावला आहे. यामध्ये लॉरेन्स बिष्णोई, अनमोल बिष्णोई, विक्की गुप्ता, सागर पाल, सोनू सुभाष चंदर आणि अनुज थापन आदींचा समावेश आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांकडून गुजरातच्या साबरमती जेलमध्ये बंद असलेल्या लॉरेन्स बिष्णोईला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. पोलिसांनी लॉरेन्सचा छोटा भाऊ अनमोलविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली आहे. अनमोल सध्या अमेरिकेत आहे. तेथून तो गुन्हेगारी कारवाया नियंत्रित करत असल्याची माहिती आहे. सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी त्याने स्वीकारली आहे.

काय आहे मकोका ?
महाराष्ट्र सरकारने १९९९ मध्ये मकोका कायदा संमत केला होता. याला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणतात. संघटित आणि अंडरवर्ल्ड गुन्हेगारी नष्ट करणे हा त्याचा उद्देश आहे. हा कायदा महाराष्ट्र आणि दिल्लीत लागू आहे. मकोकाचे कायद्याचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याअंतर्गत तपास पूर्ण होईपर्यंत त्याला जामीन मिळू शकत नाही.


सम्बन्धित सामग्री