Monday, July 01, 2024 03:41:27 AM

'तारक मेहता…' फेम सोढी बेपत्ता

तारक मेहता… फेम सोढी बेपत्ता

नवी दिल्ली, २६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : 'तारक मेहता…' फेम सोढी बेपत्ता झाला आहे. अभिनेता गुरुचरण सिंग हा 'तारक मेहता…'मध्ये सोढीची भूमिका करत होता. पण काही आठवड्यांपूर्वी गुरुचरणने 'तारक मेहता…' ही टीव्ही मालिका सोडली. मालिका सोडली तरी मोठ्या रकमेवरून गुरुचरण आणि निर्माते यांच्यात सुरू असलेला वाद शमला नव्हता. वाद सुरू असतानाच आईच्या आजारपणाचे कारण देत मनोरंजन सृष्टी सोडून गुरुचरण पंजाबला गेला होता. तिथून तो २२ एप्रिल रोजी दिल्ली विमानतळावर जाण्यासाठी निघाला. एका कामाकरिता दिल्ली विमानतळावर जाण्यासाठी निघालेला गुरुचरण २२ एप्रिल पासूनच बेपत्ता आहे. घरातल्यांनी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला तरी गुरुचरणशी संपर्क झालेला नाही. गुरुचरणच्या वडिलांनी पोलिसांकडे मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली आहे. पोलीस गुरुचरणला शोधत आहेत.


सम्बन्धित सामग्री