Monday, July 01, 2024 03:44:26 AM

गौरव मोरेच्या 'या' गोष्टीने जुही चावला झाली त्याची फॅन !

गौरव मोरेच्या या गोष्टीने जुही चावला झाली त्याची फॅन

मुंबई, २४ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे गौरव मोरे ! कॉमेडीची अचूक संधी साधत प्रेक्षकांना मनमुराद हसवणारा गौरव आता एक हिंदी शो गाजवताना दिसतोय. घराघरांत लोकप्रिय हा अभिनेता "फिल्टरपाड्याचा बच्चन " म्हणून ओळखला जातो. विनोदाचं अचूक टायमिंग साधत गौरवने महाराष्ट्रातील सगळ्याच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आणि आता हिंदीत तो मंच गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून गौरवच्या या धमाकेदार कॉमेडीवर हिंदी प्रेक्षकही खळखळून हसत आहेत आणि तो प्रेक्षकांचं नॉन स्टॉप मनोरंजन करत आहे. सध्या सोशल मीडिया वर गौरव आणि बॉलिवुड अभिनेत्री जूही चावला यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय आणि त्यामागचं कारण देखील तितकच खास आहे.

गौरवने काही दिवसांपूर्वीच ‘मॅडनेस मचाएंगे’ या हिंदी कार्यक्रमात दणक्यात एन्ट्री घेऊन पहिल्याच भागात गौरवने जबरदस्त परफॉर्मन्स दिला. गौरवची तुफान चक्का जुही चावला हिला इम्प्रेस करून गेली. आता हे नेमक प्रकरण काय आहे हे बघण उत्सुकतेचा विषय ठरल आहे.

जुही चावला आणि बॉलिवुड किंग शाहरुख खान यांच्या आयकॉनिक ‘डर’ चित्रपटातील किंग खानचं पात्र गौरव रिक्रिएट करणार असून " तू है मेरी किरण "
हे गाणं गात गौरव शाहरुखची हुबेहूब नक्कल करत असल्याचं प्रोमो मधून बघायला मिळतंय. गौरव जुहीला गुडघ्यावर बसून गुलाब देतो गुलाबाच्या पाकळ्यांची तिच्यावर उधळण करतो हा सगळा किस्सा लवकरच बघायला मिळणार असून यावर जुही काय बरं रिअॅक्ट होणार हे बघण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

गौरव या सगळ्या बद्दल बोलताना म्हणतो " मॅडनेस मचाएंगे " सुरू होऊन अगदीच काही दिवस झाले आहेत आणि हिंदीत एवढा कमालीचा शो करायला मिळणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मराठीच्या सोबतीने हिंदी प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम ही माझ्या कामाची पोचपावती आहे आणि अजून उत्तम काम करण्याची एक प्रेरणा देखील आहे. या शो मध्ये अजून धमाल मज्जा मस्ती करायची आहे पण जूही चावला मॅम सोबत मला स्टेज शेयर करायला मिळणं हे एक सुख आहे "

गौरव " मॅडनेस मचाएंगे " मध्ये तुफान लोकप्रिय होत असून मराठी प्रमाणे हिंदीत सुद्धा त्याने आपल्या कमाल कामगिरी ने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. आगामी काळात 'अल्याड पल्याड' या चित्रपटात झळकणार असून' महापरिनिर्वाण' या चित्रपटातही तो मुख्य भूमिका साकारणार आहे.


सम्बन्धित सामग्री