Monday, July 01, 2024 03:51:00 AM

मोफत अभिनय कार्यशाळा

मोफत अभिनय कार्यशाळा

मुंबई, २३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : प्रा. देवदत्त पाठक २१ मोफत अभिनय कार्यशाळा घेणार आहेत. गरजू आणि वंचितांसाठी पाठक राज्याच्या ग्रामीण भागात नागरी वस्ती, पाडे, खेडी या ठिकाणी नाट्य व अभिनय कला पोहचावी यासाठी मोफत कार्यशाळा घेण्यात येतील. गुरूस्कूल गुफानच्यावतीने मोफत कार्यशाळांचे आयोजन केले जाईल. मागील दहा वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. सोलापूर, बार्शी, मंगळवेढा, नंदुरबार, धुळे, जळगाव, नगर, बीड, ठाणे, मुंबई, तळेगांव, लोणावळा, जुन्नर येथे मागील दहा वर्षांपासून मोफत अभिनय कार्यशाळांचे आयोजन केले जात आहे. यंदाही मोफत अभिनय कार्यशाळा घेतल्या जातील. नाट्यकला राज्यात तळागाळात पोहोचावी यसाठी कार्यशाळा घेतल्या जात आहेत. प्रा. देवदत्त पाठक यांच्या नेतृत्वात मिलिंद केळकर, सीमा जोगदनकर, उषा देशपांडे पाठक, नेहा कुलकर्णी, आकाश भुतकर अक्षता, आलोक जोगदनकर हा उपक्रम राबवत आहेत.

https://youtu.be/zpDrV54k79M


सम्बन्धित सामग्री