मुंबई, २२ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : आपल्या सौंदर्य आणि बोल्डनेससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री मलायका अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बी-टाऊनच्या या ग्लॅमरस सौंदर्यवतीच्या लेटेस्ट लुकने आपल्या स्टाइल आणि फॅशने अवघी लाईमलाईटच हिरावून घेतली आहे. ज्यामध्ये ती सौंदर्याची उधळण करताना दिसत आहे. ह्या अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.
https://www.instagram.com/reel/C52fe9_SRgI/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==
आपल्या स्टाईलने चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या मलायकाचे हे फोटोज पाहून ती ५० वर्षांची आहे असे कोणीही म्हणू शकणार नाही. या वयातही मलायका तिच्या फॅशन आणि स्टाइलने धुमाकूळ घालताना दिसत आहे. तिच्या लेटेस्ट अवतारात ती तिच्यापेक्षा अर्ध्या वयाच्या मुलींनाही स्टाईलच्या बाबतीत मागे टाकताना दिसत आहे.
मलायकाची किलर स्टाईल या फोटोंमध्ये पाहायला मिळते आहे. ज्यामध्ये तिने पांढऱ्या रंगाचा कट-आऊट बॉडीकॉन गाऊन घातला आहे. ज्यामध्ये फिशटेल डिझाईन केलेले दिसते आहे. वन साइड शोल्डर या ड्रेसला खूप स्टायलिश बनवत आहे. मलायकाचा हॉट गाऊन मनेका हरिसिंघानीने स्टाइल केला आहे.
मलायकाने पांढऱ्या ड्रेससह मिनिमल गोल्डन ज्वेलरी निवडली होती. तिने हेवी कानातल्यांसोबत अंगठ्या कॅरी केल्या होत्या. याशिवाय तिने मिनिमल मेकअप आणि बन हेअर स्टाइलने तिचा लूक पूर्ण केला. मलायकाचा एकंदरीत लूक कोणालाही वेड लावायला पुरेसा होता.