मुंबई, २१ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मेगास्टार अनिल कपूर स्टारर ''१९४२: अ लव्ह स्टोरी'' या चित्रपटाच्या थिएटरमध्ये रिलीजला ३० वर्षे पूर्ण होत आहेत. मनीषा कोईराला ही मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट त्या काळात रोमान्स, अविस्मरणीय गाणी आणि अतुलनीय सिनेमॅटिक चमक यासाठी ओळखला गेला होता. विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहिला आहे. चित्रपटाची ३० वर्षे साजरी करताना निर्मात्यांनी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये विधू विनोद चोप्रा किस्सा सांगत असून अनिल आणि मनीषाचे पडद्यामागील काही खास क्षण सांगत आहेत.
View this post on Instagram
A post shared by Vidhu Vinod Chopra Films (@vidhuvinodchoprafilms)
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट अनिल कपूरच्या जबरदस्त अभिनयामुळे आणि मोहक नरेन सिंगच्या चित्रणामुळे लोकांच्या मनात राहिला. '१९४२: अ लव्ह स्टोरी'च्या संगीताची वेगळीच जादू यातून बघायला मिळाली. "एक लडकी को देखा," "रिम झिम रिम झिम," आणि "कुछ ना कहो" सारखी गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात गुंजत आहेत.