Friday, July 05, 2024 04:25:15 AM

महिला तिच्या इच्छेनुसार कपडे घालू शकत नाही का? पापाराझींवर नाराज बिग बॉस १७ फेम अभिनेत्री

महिला तिच्या इच्छेनुसार कपडे घालू शकत नाही का पापाराझींवर नाराज बिग बॉस १७ फेम अभिनेत्री


मुंबई, ५ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : गेल्या काही वर्षांत सिनेसृष्टीत ‘पापाराझी कल्चर’ मोठ्या प्रमाणात वाढलंय. एकदा कलाकार कुठेही गेला तरी त्यांच्या मागे पुढे हे पापाराझी फोटोस व्हिडिओस कॅपच्यर करण्यासाठी कायम तत्पर असतातच. काहीवेळेस आपण समाजमाध्यमांवर अभिनेत्रींचे असे अनेक व्हीडीओ पाहतो ज्यामध्ये पापाराझी जाणूनबुजून नकळत झूम-इन करून चुकीच्या पद्धतीने दर्शवतात . याआधी आलिया भट्ट, अनुष्का शर्मा यांनीसुद्धा पापाराझींना फटकारलं होतं. मात्र तरीसुद्धा पापाराझीअनेक अभिनेत्रींचे व्हिडिओस समाज माध्यमांवर अपलोड करतात

बिग बॉस १७ फेम अभिनेत्री आयेशा खानचा पापाराझींना सवाल :

अशाच पापाराझी अकाऊंट्स आणि फोटोग्राफर्सचा चांगलाच धडा ‘बिग बॉस 17’ फेम आयेशा खानने घेतला आहे. आयेशाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने फोटोग्राफर्सच्या वागणुकूची नाराजी व्यक्त केली आहे हे फोटोग्राफर्स कलाकारांना ठराविक अँगलने पोझ द्यायला सांगतात आणि त्यानंतर समाजमाध्यमांवर तो झूम-इन करून चुकीच्या पद्धतीने लोकांनसमोर आणतात अशी तळमळ तिने व्यक्त केली आहे.‘हे कसे नक्की अँगल्स आहेत? तुम्ही कुठे झूम-इन करत आहात याची कल्पना ? हे करण्याची तुम्हाला परवानगी आहे का? काही माध्यमांना नेमकं काय झालंय? कोण, कुठून आणि कोणत्या अँगलने आपला फोटो किंवा व्हिडीओ काढेल याची भीती न बाळगता एखादी महिला तिच्या इच्छेनुसार कपडे घालू शकत नाही का? हे खरंच निराशजनक कृत्य आहे’,

Ayesha Khan joins Mrunal Thakur and Palak Tiwari in slamming Paparazzi

पापाराझी आणि फोटोग्राफर्सना शिष्टाचार शिकण्याची गरज असल्याचं सांगत तिने पुढे लिहिलं, ‘कारमधून बाहेर पडताना एक महिला तिचा ड्रेस नीट करतेय आणि तुम्हाला नेमका तोच क्षण कॅमेरात कैद करून पोस्ट करायचा असतो. ती तुम्हाला विनंती करतेय की मागून फोटो किंवा व्हिडीओ काढू नका. तरीसुद्धा तुम्ही त्यावरून कॅप्शन टाकून व्हिडीओ पोस्ट करता की, अमूक एक अभिनेत्री म्हणाली, मागून फोटो किंवा व्हिडीओ काढू नका. काही मीडिया हाऊसला सामान्य शिष्टाचारसुद्धा शिकण्याची गरज आहे.’याआधी दिलेल्या एका मुलाखतीतसुद्धा आयेशाने ‘पापाराझी कल्चर’वरून चांगलीच हजेरी घेतली होती “ते तुमच्या शरीराच्या ठराविक भागांना झूम-इन करून दाखवतात, तुमचा पाठलाग करतात, जरा कुठे ‘उप्स मूमेंट’ झाली किंवा कपडे सावरण्याची मूमेंट आली की लगेच ते कॅमऱ्यात कैद करायला तयार असतात. सेलिब्रिटी हे पब्लिक फिगर असतात म्हणून तुम्ही परवानगीशिवाय त्यांचे फोटो, व्हिडीओ काढता हे मान्य आहे. पण चुकीच्या अँगलने ते व्हिडीओ झूम-इन करणं हे अत्यंत व्हायाद आणि चुकीचे आहे”, अशा शब्दांत तिने नाराजी व्यक्त केली होती.


सम्बन्धित सामग्री