Tuesday, July 02, 2024 08:59:21 AM

परिणीती चोप्राचं गाणं ऐकून नेटकऱ्यांची टीका ; ‘आज गाने की जिद ना करो’,

परिणीती चोप्राचं गाणं ऐकून नेटकऱ्यांची टीका  ‘आज गाने की जिद ना करो’


प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या एका गायनाच्या व्हिडिओमुळे चर्चेत आहे . यामधील तिचं गाणं ऐकून नेटकऱ्यांनी तिच्यावर जोरदार टीका केली आहे. आहे यानंतर पुन्हा कधीच गाऊ नकोस, असा थेट सल्लाच काहींनी दिला आहे.बॉलिवूडमध्ये असे बरेच कलाकार आहेत, ज्यांना अभिनयाशिवाय गायनातही रस आहे. अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या चित्रपटांमध्ये गाणीसुद्धा गायली आहेत. इतकंच नव्हे तर लग्नानंतर परिणीतीने गायन क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं आहे. मात्र सोशल मीडियावर नुकताच तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहे. या व्हिडीओमध्ये परिणीती तिच्या आगामी ‘अमर सिंह चमकीला’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात स्टेजवर गाताना दिसत आहे. मात्र परिणीतीचं गाणं नेटकऱ्यांना फारसं पसंत पडलं नाही. त्यामुळे अनेकांनी तिला यापुढे न गाण्याचा सल्ला दिला आहे.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Shadab Shaikh (@shadabshaikh_2361)

 

दिलजीत दोसांझ आणि परिणीती चोप्रा यांचा ‘अमर सिंह चमकीला’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँचचा कार्यक्रम पार पडला. यावेळी दिलजीतसोबत स्टेजवर उभ्या असलेल्या परिणीतीने एक पंजाबी गाणं गाऊन दाखवलं. मात्र परिणीतीला गायन जमलं नसल्याचं नेटकऱ्यांचं म्हणं आहे. ‘परिणीतीने तिची ही छुपी प्रतिभा छुपीच ठेवावी’, असं एकाने लिहिलंय. तर ‘आज गाने की जिद ना करो’, अशीआगाऊ टीका दुसऱ्या नेटकाऱ्यानी केली आहे. ‘झोपेतून उठण्यासाठी ही सर्वोत्तम अलार्म रिंगटोन असेल’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी परिणीतीच्या गायनाची खिल्ली उडवली आहे.
परिणीतीने 2017 मध्ये ‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटासाठी पहिल्यांदा पार्श्वगायन केलं होतं. तिच्या आवाजातील ‘माना के हम यार नहीं’ हे गाणं आजही लोकप्रिय आहे. परिणीतीने ‘केसरी’ या चित्रपटातील ‘तेरी मिट्टी’ हे गाणंसुद्धा आपल्या आवाजात रेकॉर्ड करून प्रदर्शित केलं होतं. इतकंच नव्हे तर स्वत:च्या लग्नासाठीही तिने खास गाणं रेकॉर्ड केलं होतं. ‘ओ पिया’ हे गाणंरिलीज करून तिने पतीला सरप्राइज दिलं होतं. मात्र या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात तिला गाणं जमलंच नाही, असंही काहींनी म्हटलंय.


सम्बन्धित सामग्री