Tuesday, July 09, 2024 01:31:31 AM

गझल पोरकी झाली…

गझल पोरकी झाली…

मुंबई, २६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : ज्येष्ठ गझल गायक पंकज उदास यांचं सोमवार २६ फेब्रुवारी २०२४ रोजी निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर मुंबईच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पंकज उदास यांना २००६ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. गझल आणि गाण्यांमुळे ते लोकप्रिय झाले होते. 'चिठ्ठी आयी है' हे त्यांचे गाणे सर्वाधिक लोकप्रिय गाण्यांपैकी एक म्हणता येईल. त्यांची 'ना कजरे की धार', 'चांदी जैसा रंग', 'एक तराफा उसका घर', 'मैं नशे मे हू', 'मैं पिता नही हू' यांसारखी अनेक गाणी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होती.


सम्बन्धित सामग्री