Friday, April 04, 2025 03:10:51 PM

व्हायरल झालेल्या 'त्या' व्हिडिओतील अभिनेत्याला ओळखलंत का ?

व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओतील अभिनेत्याला ओळखलंत का

मुंबई , ६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : सध्या समाज माध्यमांवर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. यात एक व्यक्ती रस्त्यावर पैसे मागताना दिसतोय. त्याच्या चेहऱ्यावर मोठमोठे फोड , टेंगुळ आहेत. मागून कुबड आलं आहे. एकूणच तो 'आय' या हिंदी चित्रपटातील अभिनेत्यासारखा दिसत आहे. हा विचित्र दिसणारा व्यक्ती कधी रिक्षावाल्यांकडे तर कधी रस्त्यावर पैसे मागताना फिरतोय. काहीच क्षणात हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला पण खरंतर हा एक प्रॅन्क व्हिडिओ आहे. रस्त्यावर फिरणारा हा व्यक्ती एक मराठी अभिनेता असून त्याने वेष बदलून हा प्रॅन्क केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

आपली ओळख बदलून रस्त्यांवर फिरणारा हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून 'बिग बॉस मराठी २' चा विजेता आणि लोकप्रिय अभिनेता शिव ठाकरे आहे. शिवने केलेला हा एक प्रॅन्क आहे. आणि त्याचा प्रॅन्क यशस्वी झाला आहे असं म्हणता येईल. कारण तो कुणालाही ओळखू आलेला नाही. अनेकजण त्याला घाबरत आहेत तर अनेक त्याच्यापासून दूर पळत आहेत. मात्र शेवटी एक रिक्षावाले काका त्याला पैसे देताना दिसतात. शिवने केलेल्या या प्रॅन्क व्हिडिओला इंस्टाग्रामवर २ तासात २० लाख लोकांनी पाहिले.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)


सम्बन्धित सामग्री