Tuesday, July 02, 2024 08:20:14 AM

लता दीदींविषयी 'या' खास गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?

लता दीदींविषयी या खास गोष्टी तुम्हाला माहितीयेत का

मुंबई, ६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : भारताची गानकोकिळा म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा दिवंगत गायिका लता दीदींचा चाहतावर्ग हा केवळ भारतातच नाही तर जगभरात आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी हजारो गाण्यांना आपला आवाज देऊन ती अजरामर केली. अजूनही त्यांच्या सूरावटीतील ती गाणी ऐकल्यानंतर चाहते मुग्ध होतात. आज लता दीदींचा दुसरा पुण्यस्मरण दिन. त्या निमित्तानं ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्याशी संबंधित काही गोष्टी जाणून घेऊया.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Lata Mangeshkar (@lata_mangeshkar)


गायिका लता मंगेशकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक विक्रम आपल्या नावावर केले. यात सर्वाधिक गाणी गाण्याचा, वेगवेगळ्या भाषेत गाणी गाणाऱ्या गायिका, अशा अनेक विक्रमांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यापैकी त्यांच्या काही विक्रमांची नोंद गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेक़ॉर्डमध्ये घेतली गेली होती.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Lata Mangeshkar (@lata_mangeshkar)

१९४२ मध्ये लता मंगेशकर यांनी गायन प्रवासाला सुरुवात केली. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी त्यांनी एका मराठी संगीत नाटकामध्ये काम केले होते. त्यांनी ३६ भाषांमध्ये ५० हजारांहून अधिक गाणी गायली. त्यांनी १९६० पर्यत त्यांनी ३० हजार गाण्यांचे रेकॉर्ड केले होते. त्याचवेळी त्यांची नोंद गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं घेतली होती.त्याचबरोबर संगीत क्षेत्रातील विविध पुरस्कारांनी दीदींना गौरविण्यात आले. १९८९ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले होते.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Lata Mangeshkar (@lata_mangeshkar)

१९८९ मध्ये त्यांना पद्मविभुषण तर २००१ मध्ये त्यांना देशाच्या सर्वोच्च अशा भारतरत्न पुरस्कारानं गौरविण्यात आले होते. दुसरीकडे फ्रान्स सरकारनं २००७ मध्ये त्यांना ऑफिसर ऑफ द लिजंड ऑफ ऑनरने गौरविले. भारत सरकारनं त्यांना २०१९ मध्ये त्यांच्या ९० व्या जन्मदिनी डॉटर ऑफ द नेशननं सन्मानित केले होते.


सम्बन्धित सामग्री