Thursday, July 04, 2024 09:49:31 AM

भारतीय दिग्गज कलाकारांनी जिंकला ग्रॅमी पुरस्कार

भारतीय दिग्गज कलाकारांनी जिंकला ग्रॅमी पुरस्कार

मुंबई, ०५ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : 'ग्रॅमी पुरस्कार २०२४'मध्ये भारतीय संगीतविश्वासाठी काही अभिमानास्पद क्षण पाहायला मिळाले. शंकर महादेवन, झाकीर हुसैन यांनी ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात विविध पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. ६६ वा ग्रॅमी अवॉर्ड सोहळा ०५ फेब्रुवारी रोजी लॉस एंजलिसमध्ये दिमाखात पार पडला. संगीत विश्वातील एक मानाचा पुरस्कार म्हणून या ग्रॅमी अवॉर्डकडे पाहिले जाते.

दरम्यान, झाकीर हुसैन यांनी बेला फ्लेक आणि एडगर मेयर यांच्यासमवेत 'पश्तो'साठी 'सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स' या श्रेणीअंतर्गत ग्रॅमी पटकावला. यामध्ये सर्वोत्कृष्ट बासरीवादक राकेश चौरसिया यांचीही साथ मिळाली. हुसैन यांनी या सोहळ्याच्या एका रात्रीत तीन ग्रॅमी जिंकले, तर चौरसिया यांनी दोन पुरस्कारांवर नाव कोरले आहे. देशातील या दिग्गज कलाकारांचा ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यातील विजय पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो आहे.


सम्बन्धित सामग्री