Sunday, July 07, 2024 12:20:12 AM

दक्षिण भारतीय अभिनेते ज्युनियर बलैया यांचे निधन

दक्षिण भारतीय अभिनेते ज्युनियर बलैया यांचे निधन

चेन्नई : गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकारांच्या निधनाच्या बातम्या समोर येत आहेत. सिनेसृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना यात आणखी भर पडली आहे. मल्याळम अभिनेत्री डॉ. प्रिया आणि रेंजुषा मेनन यांच्या निधनानंतर आता दक्षिण भारतीय ज्युनियर बलैया या नावाने प्रसिद्ध असलेले तमिळ अभिनेते रघु बलैया यांचं चेन्नईतील राहत्या घरी निधन झालं आहे. घरात गुदमरल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. ते ७० वर्षांचे होते. गुरुवारी (२ नोव्हेंबर रोजी) संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

कोण आहेत ज्युनिअर बलैया?

१९५३ मध्ये तामिळ चित्रपटसृष्टीतील आघाडीचे अभिनेते टी.एस. बलैया यांच्या घरी जन्मलेले, ज्युनियर बलैया यांनी चित्रपटांमध्ये पदार्पण करण्यापूर्वी नाटकांमध्ये काम केलं. शिवकुमार अभिनीत 'मेलनाट्टू मारुमाल' या चित्रपटातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि विविध चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या. ज्युनियर बलैया हे 'गंगाई अमरन' दिग्दर्शित करकट्टाकरन या हिट चित्रपटाचा देखील भाग होते.
ज्युनिअर बलैया यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत 'करकतक्करण', 'गोपुरा वासलिले' 'सुंदरकंडम' सारख्या चित्रपटांत महत्वपूर्ण भूमिका साकारल्या.
त्यांच्या २०१० च्या दशकातील काही भूमिका बऱ्याच गाजल्या.


सम्बन्धित सामग्री