Saturday, October 05, 2024 03:26:53 PM

चित्रपटांसाठी पहिल्यांदाच २९ कोटी ८५ लाखांचे अनुदान

चित्रपटांसाठी पहिल्यांदाच २९ कोटी ८५ लाखांचे अनुदान

मुंबई, २१ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : यंदा पहिल्यांदाच ८९ चित्रपट निर्मात्यांना २९ कोटी ८५ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले. चित्रपटसृष्टीचा विकास व्हावा यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत यापुढे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांना दुप्पट अनुदान तर चित्रपटाची महिला दिग्दर्शक असेल तर त्यांना पाच लाख रुपये जास्त अनुदान देण्याचा निर्णयही घेण्यात येणार आहे. शिवाय चित्रपटांसोबत डॉक्युमेंटरीसाठीही अनुदान देता येईल का, याची चाचपणी सुरू आहे; अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. मराठीमध्ये ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीला विशेष अनुदान देणार असल्याची घोषणा त्यांनी केली. राज्यात चित्रपटांच्या शूटिंगसाठी वेगवेगळ्या ठिकाणांचा विकास करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली.


सम्बन्धित सामग्री