Saturday, October 05, 2024 03:05:05 PM

अभिनेते सुनील श्रॉफ यांचे निधन

अभिनेते सुनील श्रॉफ यांचे निधन

मुंबई, १५ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : बॉलिवूडमधून दुःखद बातम्या आल्या आहेत. गुरुवारी अभिनेते रियो कपाडिया आणि शुक्रवारी अभिनेते सुनील श्रॉफ यांचे निधन झाले. सुनील श्रॉफ यांनी अक्षय कुमार, पंकज त्रिपाठीसोबत ओह माय गॉड २ या चित्रपटात भूमिका साकारली होती. तसेच यांनी ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर ते राधिका मंदाना यांच्यासोबत अनेक जाहिरातींमध्ये काम केले होते. मागील काही दिवसांपासून सुनील श्रॉफ आजारी होते. या आजारपणातच त्यांचे निधन झाले.

कर्करोगामुळे रियो यांचे निधन

अभिनेते रियो कपाडिया यांचे कर्करोग झाल्यामुळे ६६ व्या वर्षीच निधन झाले. रिओ यांच्याआधी शोले सिनेमातील अभिनेते बिरबल खोसला यांचं निधन झालं होतं. ते ८४ वर्षांचे होते. १२ सप्टेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सुनील श्रॉफ यांचे चित्रपट

'ओह माय गॉड २'
आधी 'शिद्दत'
'द फाइनल कॉल'
'कबाड़ द कॉइन'
'अभय'
'जूली'

रियो कपाडिया यांचे चित्रपट

'दिल चाहता है'
'चक दे इंडिया'
'हॅप्पी न्यू ईयर'
वेबसीरिज 'मेड इन हेवन २'
वेबसीरिज 'सिटी ऑफ ड्रीम्स'


सम्बन्धित सामग्री